
Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले होते. अखेर जयंत पाटलांनी (Jayant Patil) आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष पदापासून बाजूला होण्याबाबत भाष्य केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.15 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. येत्या काळात पक्षवाढीवर भर देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसमोर राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सात वर्ष या पदावर होते. एप्रिल 2018 मध्ये पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडेपर्यंत ते एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्यांनतर ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 12 जुलै 2025 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सात वर्ष या पदावर होते. एप्रिल 2018 मध्ये पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडेपर्यंत ते एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्यांनतर ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 12 जुलै 2025 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा करिष्मा चालला नाही आणि त्यांच्या पक्षाला सपाटून मार खावा लागला. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची कामगिरी सरस ठरली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा, विदर्भात पक्षवाढ करण्यात त्यांना अपयश आले. त्याचमुळे जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांच्या कालावधीपासून मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांच्या थांबण्याच्या भूमिकेनंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे एकच गोंधळ झाला अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्यांच्या या वक्तव्याला विरोधही दर्शवला होता. सात वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पक्षासाठी मोठी मेहनत घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.