Maharashtra Politics : जयंत पाटलांना आमचा रंग आवडेल, उपमुख्यमंत्र्यांची खुली ऑफर

Join mahayuti Eknath Shinde Open Offer Jayant Patil : विरोधक आणि सत्ताधारी ही रथाची दोन चाके असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, चांगले काम असेल तर त्याचे कौतुक करावे. आम्ही सरकार म्हणून चांगले काम करत असल्यास तेही मान्य करावे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
 Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका व्यासपीठावर “माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काही खरे नाही,” असे विधान त्यांनी केले होते. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील नाराज असल्याचा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही जयंत पाटील यांची भेट घेतली होती. जयंत पाटील यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट देत उसाच्या शेतीची पाहणीही केली.

 Jayant Patil
BJP controversy : भाजपच्या शिस्तबद्ध पक्षाच्या प्रतिमेला तडा ! हायकमांडसमोर पंकजा मुंडे-धस वादावर पडदा टाकण्याचे आव्हान

या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “जयंत पाटील हे परिपक्व नेते आहेत. त्यांच्या हालचालींचा अंदाज बांधणे कठीण आहे. ते शरद पवार यांच्या सोबत आहेत, मात्र विरोधक कमी संख्याबळाचे असले तरी आम्ही त्यांना कमी लेखत नाही.

'विरोधक आणि सत्ताधारी ही रथाची दोन चाके असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, चांगले काम असेल तर त्याचे कौतुक करावे. आम्ही सरकार म्हणून चांगले काम करत असल्यास तेही मान्य करावे. जिथे चूक असेल, तिथे जरूर सूचना द्याव्यात. पण ज्यांना भगव्या रंगात न्हाऊन जायचे असेल, त्यांनी आमच्या सोबत यावे.” अशी खुली ऑफरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जयंत पाटलांनी दिली.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. राज्यभर दौऱ्यांचे नियोजन केले. इतकी मोठी संघटना असूनही विरोधकांना जयंत पाटील हवेत, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे.''

जयंत पाटील काय म्हणाले?

नाराज असल्याचे चर्चांवर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले,मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलेल्याचा रेफरन्स बघा. राजू शेट्टींना बोलताना मी आंदोलनाच्या अनुषंगाने विधान केले होते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही खरं धरू नका. तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला पाठिंबा आहे, अशी माझी भावना होती, असे पाटील म्हणाले.

 Jayant Patil
Delhi BJP News: होळीनिमित्त भाजपचं मोठे गिफ्ट: दिल्लीतील तळीरामांच्या हरियाणा, उत्तर प्रदेशातील चकरा थांबणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com