Amol Mitkari : जितेंद्र आव्हाडांच्या अमोल मिटकरींचे चॅलेंज; म्हणाले, 'स्वतःची लायकी...'

Amol Mitkari challenge Jitendra Awhad : आव्हाड यांना निवडणुकीच्या काळात सांगायला विकासकामे नाहीत म्हणून ते असे बोलत आहेत. ते महापाकीटमार आहेत, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली.
Amol Mitkari & Jitendra Awhad
Amol Mitkari & Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंब्रा येथे प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. 'पाकीटमार' असा उल्लेख आव्हाड यांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अजितदादांबद्दल एकेरी बोलताना डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घाण वाणीतून नेहमीप्रमाणे स्वतःची लायकी दाखवली आहे .

आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, ते नेमके कुणाची औल्याद आहेत हे मी स्वतः मुंबऱ्यात प्रचार सभेतुन जाहीर सांगणार... त्यांनी त्यांचे गुंडे सभा ऐकायला पाठवावे.

मिटकरी यांनी ट्विट करता हॅशटॅक चॅलेंज असे वापरले असून त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आव्हाड यांना आव्हानच दिले आहे.

Amol Mitkari & Jitendra Awhad
Raj Thackeray: राज ठाकरेंनी डिवचले, तर आठवलेंनी खणकावले

रुपाली ठोंबरेंची टीका

रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका करत मला वाटतंय जितेंद्रभाऊ यांच्या मेंदूला काय लकवा मारलाय का? आव्हाड यांना निवडणुकीच्या काळात सांगायला विकासकामे नाहीत म्हणून ते असे बोलत आहेत. ते महापाकीटमार आहेत.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?

आव्हाड एका सभेत बोलाताना म्हणाले होते की, अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचं वेगळं निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती.

Amol Mitkari & Jitendra Awhad
Kalamnuri Assembly Constituency: पाडापाडीच्या यादीत नाव येताच संतोष बांगर समर्थकांचा ताफा अंतरवालीकडे निघाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com