Kalyan Dombivli politics: कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचा जलवा : शिवसेनेला मागे टाकून भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध

Political News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे.
ravindra chavan
ravindra chavan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांचे टेन्शन वाढले होते. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. महापालिकेत 15 नगरसवेक बिनविरोध निवडून आणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात जलवा दाखवला. चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मागे टाकून भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आणले.

कल्याण-डोंबिवली महापालिकातील भाजपचे (BJP) 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले. 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 31 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज मागे घेतले जात होते. गुरुवारपर्यंत नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये भाजपचे पाच तर शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले.

ravindra chavan
BJP Damage Control : '...तर उत्तर भारतीय महापौर असेल', कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोल, सगळे पत्ते ओपन केले!

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी जवळपास भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना व मनसेच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या होमपीचवर त्यांनी ही जादुई कामगिरी करीत विरोधकांना आस्मान दाखवले आहे.

ravindra chavan
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांची नावे व कंसात प्रभाग क्रमांक आहे. रंजना पेणकर (२६ ब),आसावरी नवरे (२६ क), मंदा पाटील (२७ अ), ज्योती पाटील ( २४ ब), रेखा चौधरी (१८ अ), मुकंद तथा विशू पेडणेकर ( २६ अ), महेश पाटील (२७ ड), साई शेलार ( १९ क), दिपेश म्हात्रे (२३ अ), जयेश म्हात्रे (२३ ड), हर्षदा भोईर (२३ क), डॉ. सुनिता पाटील (१९ ब), पूजा म्हात्रे (१९ अ), रविना माळी (३० अ), मंदार हळबे (२६ ड). तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, हर्षल मोरे हे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत.

ravindra chavan
Pune Richest Candidate: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा! शरद पवारांच्या आमदार पुत्राकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू

कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयी ‘घोडदौड’ सुरूच ठेवली आहे. सलग पॅनलमध्ये बिनविरोध विजय मिळवत भाजपने संघटनात्मक ताकद, उमेदवार निवड आणि राजकीय व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ravindra chavan
Panvel municipal election: महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का : एकाचवेळी गठ्ठाभर उमेदवारांची माघार, भाजपचे 7 जण बिनविरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com