MNS vs Shinde: पलावा पुलावरून आजी माजी आमदारांत जुंपली! मनसे आमदारांने झापताच शिंदेंचा आमदार गप्प

Heated argument between MNS and Shinde faction MLAs at Palava bridge: कल्याणशीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन व कामावरून कल्याण ग्रामीणचे आजी माजी आमदारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
Kalyan Bridge Inauguration Sparks Row between MNS And Shivsena
Kalyan Bridge Inauguration Sparks Row between MNS And ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Dombivli Political News: कल्याणशीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन व कामावरून कल्याण ग्रामीणचे आजी माजी आमदारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. घाईघाईने आमदारांनी पुलाचे उद्घाटन का केले?

दुसऱ्या पुलाची अलाइनमेंट का चेंज करण्यात आली? असा सवाल कल्याण ग्रामीण मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला. तर शिवसेना (शिंदे) आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांनी काय बोलायचे त्यांना बोलू द्या, लोकांच्या सुविधेसाठी हा पूल सुरू केला असल्याचे सांगितले.

कल्याण-कल्याण शीळ रोडवर असलेल्या नवीन पलावा पूलावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या कामातील त्रुटी दाखवून दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, पुलाचे अजूनही काम सुरू आहे, ते पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने संबंधित प्रशासनाला हा पूल अद्याप हस्तांतरीत केलेला नाही.

तरी देखील स्थानिक शिवसेना आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला. पुलावर काही अपघात झालेत. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच एसीबीकडे यांची तक्रार केली गेली पाहिजे असे ते म्हणाले. या पुलाच्या गर्डर बसविण्याच्या कामाचे फटाके फोडून उत्साह करण्यात आला होता. मग पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते केले नसते का? भीतीपोटी त्यांनी हा पूल सुरू केला.

अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने याठिकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यांनी लवकरात लवकर या पूलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या अर्धवट पुलाची पाहणी करत ते म्हणाले, या पुलाची अलायमेंट का बदलण्यात आली? ती कशासाठी? हा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Kalyan Bridge Inauguration Sparks Row between MNS And Shivsena
MNS VS Shivsena UBT : युतीच्या चर्चा सुरू असतानाच मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या नेत्यांवर घणाघाती टीका; म्हणाले, 'चमचेगिरी...'

शिवसेना ठाकरे घटाने पुलावरील अपघाताप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी माजी आमदार पाटील म्हणाले, पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी.

याच्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारीची चौकशी करण्यात यावी, तेव्हा या पूलाच्या कामातील काळंबेरं बाहेर येईल. पोलिस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटिस देतील त्यातून काही साध्य होणार नाही याकडे पाटील यानी लक्ष वेधले आहे.

हा पूल झाला तो दुरुस्त होऊन सुरु होईल. पण याच पूलाची दुसऱ्या मार्गीकेची अलायमेंट बदलली आहे. त्याठिकाणी काम सुरु आहे. तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?

असा सवाल पाटील यांनी उपस्थीत करत याला आयुक्त देखील जबाबदार असतील असे भाष्य केले आहे. या पूलाच्या मार्गीकेसह दिवा पूलाची, मेट्रोची अलायमेंटही चेंज करण्यात आली आहे. बड्या बिल्डरांच्या हितासाठी ही अलायमेटं चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

Kalyan Bridge Inauguration Sparks Row between MNS And Shivsena
Shivsena Vs MNS : 'मी आणि माझा बबड्या...', एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचले, एका वाक्यात विषय संपवला!

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे म्हणाले, विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे. पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले गेले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com