MNS VS Shivsena UBT : युतीच्या चर्चा सुरू असतानाच मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या नेत्यांवर घणाघाती टीका; म्हणाले, 'चमचेगिरी...'

Mns shivsena alliance Break Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत म्हटले होते की, सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणं.
uddhav thackeray Raj  thackeray
uddhav thackeray Raj thackeraySarkarnama
Published on
Updated on

Mns shivsena Alliance : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, असे म्हणत मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच मनसे नेत्यांकडून थेट उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जाते आहे.

मनसे नेते, मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना याआधी युतीची आवश्यकता वाटली नाही. जर त्यांचे 60 आमदार विजयी झाले असते तर त्यांनी युतीसाठी साद घातली असती का? असा प्रश्न विचारला होता. आता त्यांनी ट्विट करत युतीबाबत मत व्यक्त करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांना टार्गेट केले आहे.

संदीप देशपांडे ट्विट करत म्हटले आहे की, 'ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये.'

'जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा.', असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना नाव न घेता हा टोला लगावल्याचे बोलले जात आहे.

uddhav thackeray Raj  thackeray
Nitesh Rane: राणेंना पेंग्विन, बदकाची उपमा देणाऱ्या ठाकरेंच्या 'मातोश्री'समोर झळकले 'वस्ताद' अन् 'हिंदू गब्बर'चे बॅनर

मनसेचे सूर बदलले?

युतीसाठी सकारात्मक असलेल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक असल्याचे संकेत दिले. एप्रिल महिन्यापासून युतीबाबत चर्चा होत्या. मात्र, प्रत्यक्षात युतीसाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिलेला नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचे सूर बदलले दिसत आहेत.

संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत म्हटले होते की, सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणं आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं .भाषा जगली तरच आपण जगू

uddhav thackeray Raj  thackeray
Nilesh Lanke : खासदार निलेश लंके जमिनीवर झोपले, जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम! नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com