
Raju Patil News : शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईत गुरुवार पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपल्या मेळाव्यातून जहरी टीका केली. एकनाथ शिंदेंनी यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवताना तुम्हाला विधानसभेत जनतेने गाडून टाकल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत न देता महाराष्ट्राच्या जनतेचे मनात आहे ते होईल, असे म्हटले. या मेळाव्यानंतर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते याची उत्सुकता होती. अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा संपताच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिंदेंना टोला लगावला.
राजू पाटील यांनी 'मी आणि माझा बबड्या…..मेळावा संपला!', असे अवघ्या एका वाक्यचे ट्विट करत एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याच्या खिल्ली उडवली. तसेच अभ्यासक्रमात हिंदी पहिलीपासून शिकवण्याच्या मुद्द्यावरून देखील पाटील यांनी एकनाथ शिंदेंने सुनावले. ते म्हणाले, शिवसेना पक्ष,शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या "मराठी" भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेच्या बाबत आपली भूमिका मांडताना का दिसत नाहीत ?
लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठींबा दिला होता. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राजू पाटलांनी प्रचार केला होता. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आघाडीवर होते. मात्र, विधानसभेत मनसे स्वबळावर लढली. श्रीकांत शिंदे लोकसभेतील मदतीची आठवण ठेऊन राजू पाटलांना पाठींबा देतील अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेने आपला उमेदवार राजू पाटलांच्या विरोधात उतरवून त्यांचा पराभव केला. त्यामुळे पाटलांच्या मनात श्रीकांत शिंदेंविषयी राग असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होणार पण काही जणांना मराठी माणूस एकत्र आलेला नको आहे म्हणून हाॅटेलमध्ये गाठीभेटी घेतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत त्यांनी दिले. तर, मनसेसोबत युतीवरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हटले की, युतीसाठी ते लाचार झालेत. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे किती आगतिक झालीये हे आपण पाहतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.