

Madhi Kanifnath Yatra controversy : पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत, मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्याच्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत आक्रमक झाली होती. तसा गेल्या वर्षी ठराव पुढे करत, यावर्षी देखील मुस्लिम व्यावसायिकांना विरोध करण्यात आला.
सकल हिंदू समाजाने आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), आमदार महेश लांडगे यांची मढी इथं आक्रमक सभा घेतली. देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थांच्या मालकीच्या गाळे मुस्लिम व्यावसायिकांना देत, व्यवसायाला मुभा दिला. यावरून सरपंच संजय मरकड यांचा तिळपापड झाला असून, त्यांनी हे मुस्लिम व्यावसायिक देवस्थान विश्वस्तांचे नातेवाईक असतील, असा घणाघात केला आहे.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी कानिफनाथ यात्रेत आज रंगपंचमीला मुख्य यात्रा झाली. या यात्रेत रेवड्यांची उधळण होते. तसंच राज्यात याच यात्रेतील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. शेकडो देवकाठ्या यात्रेच्या आजच्या मुख्य दिवशी मिरवणुकीत सहभागी होत, मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं.
ही यात्रा गेल्या तीन ते दोन वर्षांपासून मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांच्या विरोधावरून गाजत आहे. सरपंच संजय मरकड यांनी गेल्यावर्षी मढी ग्रामपंचायतीमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत, दुकाने लावण्यास विरोध केला. हिंदू धर्माचं पावित्र्य पाळलं जात नाही, असा मुद्दा पुढे करत, ग्रामपंचायतीत ठराव घेतला. हा मुद्दा गेल्यावेळीच न्यायालयात गेला होता.
औरंगाबाद खंडपीठाने ग्रामपंचायतीच्या ठरावाला स्थगिती दिली होती. परंतु हा ठराव असल्याने, तो रद्द करण्यासाठी पुन्हा ठराव घेणे गरजेचा आहे. पण सध्या प्रशासकीय राज ग्रामपंचायतींमध्ये सुरू असल्याने, सरपंच संजय मरकड यांनी गेल्यावर्षीचा ठराव पुन्हा पुढे करत, मुस्लिम व्यावसायिकांना विरोधाचा मुद्दा लावून धरला.
यासाठी सकल हिंदू समाजाचा मेळावा मढी इथं घेतला. आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यांनी या मेळाव्यात आग ओकणारं भाषण केलं. परंतु मढी देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम व्यवसायिकांना आजच्या मुख्य यात्रेत व्यवसायिसाठी गाळे दिले. यावरून संजय मरकड चांगलेच आक्रमक झाले.य़
संजय मरकड म्हणाले, "मढी ग्रामपंचायतीच्यावतीने 2700 व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवाने देण्यात आले. काही व्यावसायिकांना जागेवर कागदपत्रांची तपासणी करून, परवाने दिले. व्यावसायिकांचा आकडा साडेचार ते पाच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत दुकाने लावण्याचा निर्णय ऐतिहासिक झाला. यामुळे मढीत आज 25 ते 27 लाख भाविक मढीत असल्याचा दावा मरकड यांनी केला."
'ग्रामपंचायतीच्या हद्दीत, जे गावातील मुस्लिम होते, त्यांना देखील यात्रेत दुकाने लावण्यास मढी ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आहे. पण कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे जे गाळे आहेत, त्यांनी मात्र मुस्लिमांना परवानगी दिली आहे. कदाचित ते नातेवाईक असावेत. म्हणून त्यांनी त्यांना परवानगी दिली असावी,' असा घणाघात मरकड यांनी केला आहे.
देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी, यावर्षी भाविकांनी जास्त प्रमाणात गर्दी केली आहे. यात्रेच्या मुख्य आजच्या दिवशी जवळपास 15 लाख भाविकांनी मढीत हजेरी लावली आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी देवस्थानच्यावतीने विविध उपयोजना केल्या आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.