Rajendra Gavai News : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमला गवई यांना अमरावतीमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. मात्र, त्यांच्यावर होत असलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर 'आपण आंबेडकरी विचारांच्या आहोत, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.', असे कमला गवई यांची स्वाक्षरी असलेले पत्र व्हायरल झाले होते.
या पत्रानंतर कमला गवई या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, याची चर्चा सुरू असताना त्यांचे पुत्र, आरपीआय (गवई) पक्षाचे नेते, राजेंद्र गवई यांनी सांगितले की, 'पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे त्याचं निमंत्रण आईसाहेबांना भेटलेल आहे. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारल आहे.'
'आईसाहेबांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.पण मी त्यांना एक सांगेल, तु्म्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सरचिटणीस म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.', असे देखील राजेंद्र गवई म्हणाले.
कमलगवई दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये नाहीत. त्यांचा फोन देखील बंद आहे. सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाल्यानंतर शनिवारी पत्रकार त्यांच्या घरी तीन तास बसून होते. मात्र, त्या घरी नाही एवढेच सांगण्यात आले. सध्या जे पत्र व्हायरल होत आहे त्यावरील अक्षर त्यांचे नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
राजेंद्र गवई यांनी कमला गवईंच्या पत्रावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे हे पत्र खरे आहे की खोटे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, पुढे बोलताना ते म्हणाले की, 'संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहेत.'
'विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे (रा.सू.गवई) संबंध होते. त्यांचे संबंध भावाभावांचे होते. परंतु विचारधारा ही वेगवेगळी होती. कार्यक्रमाला गेले म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच होत नाही. एकमेकांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे, अशा मताचा मी आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
'भूषणजी गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे उलट्या सुलट्या सोशल मीडियावर टीका केल्या जातायेत. आम्ही सर्वधर्मसमभावाला मानणारे आहोत. सर्वधर्मसमभावाची भूमिका जो पक्ष घेतो त्यांच्या सोबत आम्ही कालही होतो, आजही आणि आणि उद्याही आहेत.', असे देखील राजेंद्र गवई यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.