Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या नेतृत्वात आदिवासींचे 25 आमदार राज्यपालांना भेटणार, 1 हजार 165 ठराव पुढ्यात ठेवणार

Maharashtra tribal MLAs : नाशिकमध्ये झालेल्या महापंचायतीत प्राप्त झालेले 1 हजार 165 ठराव मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकारातून सकल आदिवासी समाज राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal : सकल आदिवासी समाजातर्फे शुक्रवारी (ता. 26) नाशिकमध्ये आदिवासी महापंचायत झाली. 13 जिल्ह्यातील आदिवासी ग्रामपंचायतीचे सरपंच या महापंचायतीला उपस्थित होते. या महापंचायतीत एकूण एक हजार 165 ठराव प्राप्त झाले आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात व पुढाकारातून सकल आदिवासी समाज हे ठराव राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.

आदिवासी आश्रमशाळांसाठी खासगी कंपनीमार्फत होत असलेली भरती रद्द करावी, बंजारा व धनगर समाजांचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समावेश करू नये या प्रमुख मागण्यांसाठी या महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायत मध्ये प्राप्त झालेले सर्व ठराव राज्यपालांकडे सुपूर्द केले जाणार असून त्यासाठी राज्यपालांची लवकरच वेळ घेण्यात येणार असल्याची माहिती बिऱ्हाड आंदोलकांनी दिली.

राज्यात आदिवासी समाजाचे एकूण 25 आमदार आहेत. या सर्व आमदारांची 6 ऑक्टोबरला एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती आहे. मंत्री झिरवाळ यांच्या पुढाकारातून राज्यपालांची भेट घेण्याचे नियोजन सध्या सुरु आहे. यावेळी आदिवासी महापंचायतीत मंजूर ठराव राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. बाह्यस्त्रोत भरती रद्द करून ठरावांची अंमलबजावणी करण्याची विनंती राज्यपालांना करण्यात येणार आहे.

Narhari Zirwal
Jalgaon News : जळगावात शिवसेनेचा नेता गोत्यात ; फार्म हाऊसवर सुरु होतं धक्कादायक कृत्य, पोलिसांची अचानक धाड

आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत वर्ग-3 व वर्ग-4 या संवर्गातील एक हजार 791 पदांची भरतीप्रक्रिया सुरू असून या भरतीच्या विरोधात नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर गेल्या तीन महिन्यांपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. नाशिकमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे, परंतु भरपावसात आंदोलन कायम असून आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. त्यांच्या प्रकृतीविषयी मंत्री झिरवाळ यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

Narhari Zirwal
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू! भाजप प्रवक्त्याची धमकी, काँग्रेसने थेट शहांकडे केली मोठी मागणी

सकल आदिवासी समाजातर्फे शुक्रवारी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानाजवळील ईदगाह मैदानावर आदिवासी महापंचायत घेण्यात आली. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली होती. पण आदिवासी समाज चिखलाची वाट तुडवत महापंचायतीला हजर झाला. यावेळी 'पेसा' क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी ठराव लिहून दिले. यात सर्वाधिक ठराव हे नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झाले असून विशेषतः कळवण व सुरगाणा तालुक्यांतून ठराव प्राप्त झाले. याशिवाय, नंदुरबार, पालघर या जिल्ह्यांतूनही ठराव प्राप्त झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com