Girija Raut Case: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांनंतर करुणा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मला महिला आयोगाचं अध्यक्ष करा...

Karuna Munde On Vinayak Raut Family Issue: विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून असून, त्यांनी कुटुंबाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे.
Karuna Munde
Karuna MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सून गिरीजा राऊत यांनी विनायक राऊत त्यांचा मुलगा आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधातच कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर आता करुणा मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराज्य शक्ति सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी माजी खासदार विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केल्याप्रकरणावर भाष्य करताना सोमवारी(ता.13) मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, महिलांच्या तक्रारींना न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तातडीनं भरलं जावं, अशी मागणी केली आहे.

करुणा मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक दावा केला आहे. त्या म्हणाल्या, सध्याचे अनेक लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असून त्यापैकी अनेकांचे भोंदूबाबांशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी आपण लवकरच माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाई असलेल्या गिरीजा राऊत यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींवरही थेट भाष्य केलं. मात्र,मुंडे यांच्या एन्ट्रीनंतर हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Karuna Munde
Sangli News: मोठी बातमी: जयंत पाटलांना अवघ्या 2 दिवसांत सलग दुसरा धक्का; ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे बंधूही ठरले अपात्र

विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून असून, त्यांनी कुटुंबाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. मात्र विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com