kirit Somaiya News : सिल्लोडहून परतताच किरीट सोमय्यांनी केली 'एसडीएम'ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

Kirit Somaiya demands the dismissal of the SDM of Sillod from Chief Minister Devendra Fadnavis, raising concerns over the administration's actions in the region. : एसडीएम यांनी केवळ आधार कार्डच्या आधारावर वाटप केलेल्या 406 जन्म प्रमाणपत्रांची तसेच साडेचार हजाराहून अधिक प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी करावी.
Kirit Somayia Letter To CM Fadnavis News
Kirit Somayia Letter To CM Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड दौऱ्याहून परतताच 'एसडीएम'खान यांची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खान यांनी सिल्लोडमधील 406 अशा लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे, ज्यांचा जन्म सिल्लोड किंवा भारतात झाल्याचा एकही पुरावा नाही, असा दावा सोमय्या यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि उपविभागीय अधिकारी खान यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

किरीट सोमय्या (Kirit Soamiya) यांनी मंगळवारी सिल्लोडचा दुसऱ्यांदा दौरा केला. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी, तसेच सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात जाऊन बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलेल्या 406 जणांची यादी देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सिल्लोडचे मालेगाव होणार, असा आरोप करत सोमय्या यांनी हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांकडे नेले आहे.

सिल्लोडचा दौरा झाल्यानंतर आज सोमय्या यांनी एसडीएम यांनी केवळ आधार कार्डच्या आधारावर वाटप केलेल्या 406 जन्म प्रमाणपत्रांची तसेच साडेचार हजाराहून अधिक प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी करावी. (BJP) तसेच खान यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सिल्लोड येथेही बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या संदर्भातील कागदपत्रांची व अर्जांची माहिती मिळवण्यासाठी दोन महिन्यापुर्वी सोमय्या सिल्लोडमध्ये आले होते.

Kirit Somayia Letter To CM Fadnavis News
Kirit Somaiya Politics: वकील म्हणाले, 'किरीट सोमय्या हा तर मूर्ख माणूस'

सिल्लोड चे उपविभागीय अधिकारी खान यांनी 406 अश्या लोकांना जन्माचे प्रमाणपत्र दिले ज्यांनी त्यांचा जन्म सिल्लोड किंवा भारतात झाल्याच्या एकही पुरावा दिलेला नाही. अर्जासोबत फक्त आधार कार्ड दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे खान यांची हकालपट्टी करावी व सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश द्यावे, असे सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Kirit Somayia Letter To CM Fadnavis News
Jayant Patil reaction on BJP meet : 'होय, मी बावनकुळेंची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो, पण..!'; जयंत पाटलांचं पुन्हा ट्विट

सिल्लोड येथे वर्ष 2024 मध्ये 4855 अर्ज आले, एकही फेटाळले गेले नाही, यात 3000 अर्ज संशयास्पद असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. सिल्लोड नगरपरिषदेसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधून केवळ आधार कार्डांच्या आधारे अशा बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या बोगस प्रमाणपत्रांची संख्या पाहता राज्यात सिल्लोड तालुका हा अव्वल ठरत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com