Kolhapur Loksabha : शाहू महाराजांना न मागताच 'एमआयएम'चा पाठिंबा

Imtiyaz Jaleel : एआयएमचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला.
Imtiyaz Jaleel Shahu Maharaj
Imtiyaz Jaleel Shahu Maharajsarkarnama

Loksabha Election 2024 : कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होत आहे. शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतील पक्षांचा पाठिंबा आहे.

शिवाय त्यांना वंचित बहुजन आघाडीनेदेखील पाठिंबा दिला आहे. सामाजिक संघटनांनीदेखील शाहू महाराजांचे समर्थन केले आहे. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) ने शाहू महाराजांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

Imtiyaz Jaleel Shahu Maharaj
Shirur Lok Sabha Constituency : शिरुरच्या लढतीत ट्विस्ट! 'वंचित'चा उमेदवार वाढवणार कोल्हे - आढळरावांचे टेन्शन

एमआयएमचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला. जलील यांनी स्पष्ट केले की, शाहू महाराज यांनी त्यांच्याकडे पाठिंबा मागितला नव्हता. मात्र, आम्ही स्वतःहून त्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जलील म्हणाले, शाहू महाराज Shahu Maharaj यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना सांगितले. शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा आम्ही एकमताने निर्णय घेतल्याचे त्यांना सांगत याबाबत चर्चा केली. मी कोल्हापूरमधील आमच्या पक्षातील लोकांना सांगितले की शाहू महाराज यांचे समर्थन करा.

शाहू महाराजांनी समर्थन मागितले नाही किंवा मला फोन केला नाही आम्ही स्वतःहून त्यांच्याबरोबर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्ष छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत.

त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करत आहेत. शाहू महाराज कोण आहेत, त्यांचं कोल्हापुरात काय स्थान आहे याची विरोधकांना कल्पना नसावी, असा टोलादेखील महायुतीला जलील यांनी लगावला.

R

Imtiyaz Jaleel Shahu Maharaj
Ajit Pawar On Narendra modi : 'मोदींनी पुतीनला फोन करून युद्ध थांबवलं', भर सभेत अजित पवारांनी काय सांगितलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com