Kolhapur News: कोल्हापुरात पुढच्या 24 तासांत मोठा राजकीय भूकंप, हादरा 'गोकुळ'मध्येही बसणार; बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर

Kolhapur politics breaking news: गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळच्या राजकारणात आपली खुर्ची शाबूत ठेवल्यानंतर मागील वेळी गोकुळच्या निवडणुकीत गटाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
Vishwas Patil Eknath Shinde Shivsena News
Vishwas Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. या धक्क्यामुळे गोकुळ दूध संघामधील राजकारण फिरणार असल्याचे संकेत आहेत. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शनिवारी(ता.10) शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या दुपारनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित समजला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी आतापासूनच जिल्हा परिषदेचे मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी केली आहे

गेल्या काही दिवसांपासून गोकुळचे (Gokul) माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत होती. त्यांचे चिरंजीव आणि शिरोली येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील हे पाडळी खुर्द या जिल्हा परिषद मतदार संघामधून इच्छुक आहेत. ते महायुतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्याचा शिवसेनेत पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विश्वास पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर गोकुळ मधील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. शिवाय विश्वास पाटील हे सध्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गोकुळच्या राजकारणातील विश्वासू नेते आहेत. त्यामुळे मंदार पाटील यांना हा धक्का समजला जातो.

Vishwas Patil Eknath Shinde Shivsena News
Nilesh Lanke On Sangram Jagtap controversy : लंकेंनी जगतापांवर साधला निशाणा; सरकारी बाॅडीगार्डचा गैरवापर, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा दिला इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत . त्याचवेळी विश्वास पाटील आणि सचिन पाटील हे दोघेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

एका दगडात दोन पक्षी

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे गोकुळच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत. त्यातच चिरंजीव सचिन पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय पुन्हा एकदा अध्यक्षपदाची खुर्ची सेफ केली आहे.

Vishwas Patil Eknath Shinde Shivsena News
Marathwada windmill dispute: पुन्हा नादाला लागू नको, तुझाही संतोष देशमुख करू : मराठवाड्यातील आणखी एका सरपंचाला मारहाण

गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळच्या राजकारणात आपली खुर्ची शाबूत ठेवल्यानंतर मागील वेळी गोकुळच्या निवडणुकीत गटाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. सत्ता आल्यानंतर विश्वास पाटील हे दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष बनले होते. आता पुन्हा एकदा शिवसेनेत जाऊन गोकुळ मधील खुर्ची देखील शाबूत याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com