Santosh Deshmukh : "नादाला लागू नको, दुसरा 'संतोष देशमुख' करू : पवनचक्कीच्या वादात आणखी एका सरपंचाला जबर मारहाण करत धमकी

Dharashiv district violence News : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्कीचे कामे सुरु आहेत. त्यामुळे या ठिकाणी पवनचक्कीसाठी विजेचे खांब उभारण्याचे कामे सुरु आहेत.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मराठवाड्यात पवनचक्कीच्या वादातून वर्षभरापूर्वी बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेंडी गावचे सरपंच तुकाराम वीर यांच्यासह त्यांच्या पुतण्याला 15 ते 20 जणांनी जबर मारहाण केली असून 'तुझा ही संतोष देशमुख करणार' अशी धमकी दिली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. मराठवाड्यात पवनचक्कीचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यातून शेतकरी व संबंधित कंपनीचे कर्मचारी यांच्यातील वादाचे प्रकार घडत आहेत.

Crime News
BJP News: भाजप आमदाराचा 'उद्योग'; बावनकुळेंच्या डोक्याला ताप; दोन सभांमध्ये बंडखोर उमेदवारांचा धुडगूस

वाशी तालुक्यातील दहिफळ शिवारातील गट क्रमांक 22 मध्ये सध्या पवनचक्कीसाठी विजेचे खांब उभारणीचे काम सुरु आहे. सेरेटिंका कंपनीने हे काम दुसऱ्या एका कंपनीला दिले आहे. या खांबावरील विजेची वाहिनी रुतुध्वज वीर यांच्या शेतातून गेली आहे. सरपंच वीर यांनी संबंधित कंपनीच्या वीज वाहिनीच्या कामाचे पैसे गेल्या चार महिन्यांपासून मागत होते; मात्र संबंधिताकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.

Crime News
Shivsena Politics : नगरपालिकेच्या प्रचारात शिंदेंचा सामंतांना फोन, तर महापालिकेसाठी नेमकं उलटं..., 'ती' घोषणा हवेत असतानाच दिलं आणखी एक मोठं आश्वासन

गुरुवारी सकाळी तांदूळवाडी (ता. वाशी) येथे पंधरा ते वीस जणांनी सरपंच वीर यांच्या शेंडी येथील घराबाहेर बोलावण्यात आले. यावेळी ते घराबाहेर आले असता त्यांच्यासह पुतणे रुतुध्वज यांना लाठ्या काठ्या तसेच दगडांनी जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सरपंच वीर यांना मुका मार लागला, तर रुतुध्वज यांच्या छातीवर जबर मार लागला. दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Crime News
Congress crisis : काँग्रेसने कष्टाने निवडून आणलेले 6 नगरसेवक फुटले : भाजपच्या निकटवर्तीय नेत्याला उपनगराध्यक्ष करण्यावरून पक्षात भूकंप

गेल्या चार महिन्यापासून माझा पुतण्या रुतुध्वज याच्या शेतातून गेलेल्या पोलच्या विद्युत वाहिनीच्या पैशाची मागणी करीत होतो; मात्र आम्हाला सतत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यानंतर माझ्या घरी आलेले अमर भराटे व त्याच्यासोबत असलेल्या पंधरा ते वीस जणांनी मला व माझ्या पुतण्याला लाठ्या-काठ्याने जबर मारहाण करीत 'तुझाही संतोष देशमुख करणार अशी धमकी दिली, अशी प्रतिक्रिया शेंडीचे सरपंच तुकाराम वीर यांनी दिली आहे.

Crime News
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचा रणनीती यशस्वी; दिलजमाई अन् गुप्तांची घरवापसी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com