Loan Waiver : पश्चिम महाराष्ट्रातील 15 हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी अडचणीत : तात्काळ करावे लागणार 'ही' प्रक्रिया

Kolhapur-Sangli Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र, कोल्हापूर सांगलीतील तब्बस 15 हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याचा धोका आहे.
Farmers not included in first loan waiver list
Farmers not included in first loan waiver listSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १२ हजार ९१४ व सांगली जिल्ह्यातील ६८ हजार ९८१ पैकी २१ हजार ७२५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज १५६ कोटी ५४ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे रक्कम आता झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखीन काही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. मात्र जवळपास 15 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी विविध कारणाने अडचणीत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना केवायसी यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

कोल्हापुरात सर्वाधिक ११ हजार १९८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बँकेत जमा झाले आहेत. तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या १ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ कोटी ५८ लाख रुपये जमा झाले आहेत.

योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार ५५२ पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २४ हजार ४२९ व राष्ट्रीयीकृत बँकांची १२ हजार १२३ कर्जखाती आहेत. शासनाकडून मिळालेल्या पहिल्या यादीत २६ हजार ९९७ पात्र लाभार्थ्यांचा समावेश असून, त्यापैकी १८ हजार ३७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूरातील ८ हजार ६२४ पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७ हजार २५४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच २ हजार १३ लाभार्थ्यांकडे ॲग्रिस्टॅक क्रमांक नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रिस्टॅक क्रमांक काढून केवायसी करावी लागणार आहे. शिवाय जिल्ह्यातील १ हजार ५६४ लाभार्थी शेतकरी मयत असल्याचे आढळले आहे. त्यांच्या वारसांनी महसूल विभागाकडे वारस नोंद करावी लागणार आहे.

Farmers not included in first loan waiver list
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत फडणवीसांचा महत्वाचा खुलासा! 6.22 बँक खाती झाली Nil, कर्जखात्यांच्या CIBIL बाबतही दिलं स्पष्टीकरण

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ७२६ लाभार्थ्यांच्या खात्यावर १३२ कोटी ८५ लाख रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या १ हजार ९९९ लाभार्थ्यांच्या खात्यावर २३ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले.

३८ हजार ४१० पात्र लाभार्थी

जिल्ह्यातील ६८ हजार ९८१ पात्र कर्जखाती शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली आहेत. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेची ५६ हजार ९६२, तर राष्ट्रीयकृत बँकांची १२ हजार १९ कर्जखाती आहेत. शासनाच्या पहिल्या यादीत ३८ हजार ४१० पात्र लाभार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी ३१ हजार ९४४ शेतकऱ्यांचे ‘आधार’ प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील अद्याप ६ हजार ४१८ पात्र लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ केलेली नाही. त्यातील ४ हजार ५०९ शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ क्रमांक नसल्याने केवायसी पूर्ण झालेली नाही. तर १ हजार ६७६ पात्र लाभार्थी मृत असून वारस नोंद करावी लागणार आहे.

Farmers not included in first loan waiver list
Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कर्जमाफी योजनेची तिसरी यादी जाहीर, 17 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com