दरवाजा उघडला अन्...बंद खोलीत आढळला महिला वनरक्षकाचा मृतदेह; समोर आलेला प्रकार पाहून परिसर सुन्न!

22 year old woman forest guard found dead : २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दरवाजा उघडल्यानंतर समोर आलेल्या प्रकाराने नागरिकांना धक्का बसला.
22 year old woman forest guard found dead
22 year old woman forest guard found deadSarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात 22 वर्षीय महिला वनरक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आंबोली वन परिमंडळातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आश्लेषा सागर मांगले यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्या मूळच्या आजरा, कोल्हापूर येथील रहिवासी होत्या.

आश्लेषा मांगले या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी त्यांची सुट्टी असल्याने त्या दिवसभर खोलीतच होत्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या घराबाहेर न आल्याने घरमालकांना संशय आला.

घरमालकांनी आश्लेषा यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी आश्लेषा लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. हे दृश्य पाहून घरमालकांना मोठा धक्का बसला.

22 year old woman forest guard found dead
Girish Mahajan : महाजनांचे हात झटकण्याचे दिवस गेले! गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली, पण डोक्यावर काटेरी मुकुटही आला

ही घटना रविवारी दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. आश्लेषा यांनी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आश्लेषा मांगले या सुमारे 3 वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन विभागाच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्याकडे आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने वन विभागासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

22 year old woman forest guard found dead
BJP Leader : भाजपमध्ये मोठा भूकंप! राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा राजीनामा; पत्रातील 2 धक्कादायक कारणांनी राजकीय वर्तुळात खळबळ

घरमालक पूजा गोवेकर यांनी दिलेल्या खबरीनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत. आश्लेषा यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com