राणेंच्या 'त्या' दहशतीमुळे ठाकरेंना काय भोगावं लागलं? केसरकरांनी सगळं सांगितलं!, आदित्य ठाकरेंच्या आरोपावरही प्रहार

Deepak Kesarkar On Aditya Thackeray Allegations : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गणवेश वाटप व्यवहारावर शंका उपस्थित केली होती. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
Deepak Kesarkar Aditya Thackeray And Uddhav Thackeray
Deepak Kesarkar Aditya Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : महायुतीच्या काळातील निर्णयावरून आता पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या आत आणि बाहेर आरोप होताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात मराठीच्या मुद्द्यावर वाद वाढत जाऊन विधीमंडळातच बुट्टापर्यंत भाषा गेली होती. त्यामुळे या अधिवेशनात शिवसेवना (ठाकरे) आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आली आहे. अशातच पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गणवेश वाटप व्यवहारावर शंका उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून शिवसेना नेते आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Aaditya Thackeray's Allegations on Uniform Distribution Spark Heated Response from Deepak Kesarkar)

आदित्य ठाकरे यांनी केसरकर हे शिक्षणमंत्री असता झालेल्या गणवेश वाटप व्यवहारावर शंका उपस्थित करत टीका केली होती. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी, केसरकर विधिमंडळ भवनात जात असताना त्यांच्याकडे पाहत, शाळेच्या मुलांचे गणवेश कुठे आहे? अशी घोषणा केली होती. त्याठिकाणी उपस्थित असलेले भास्कर जाधव यांना हसू आवरता आले नाही. यावेळी जितेंद्र आव्हाडांसह महाविकास आघाडीतील अनेक आमदार उपस्थित होते.

यावरून आता वाद सुरू झाला असून आदित्य ठाकरेंचा बोलणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. त्यांची स्थिती ही ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी आहे, अशा शब्दांत केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी केसरकर म्हणाले, मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचे सिद्ध करावे. मी राजकारणातून संन्यास घेईन. माझी बांधीलकी माझ्या मातीशी आणि तत्त्वांशी आहे. पण असे कोणी अरोप करत असेल तर त्याला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Deepak Kesarkar Aditya Thackeray And Uddhav Thackeray
Deepak Kesarkar: पालिकेच्या पैशांवर जगतेय ठाकरे फॅमिली...; शाळेच्या मुलांचे गणवेश कुठे? म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना सुनावलं

यावेळी केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या गणवेश कुठं आहे या प्रश्नाचे उत्तर देताना, यापूर्वी फक्त मागासलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जायचा. पण सर्वांना गणवेश देण्याचा निर्णय मी घेतला. चांगल्या दर्जाचा गणवेश दिला. पुस्तकांचे ओझे देखील कमी केलं. पण आता आदित्य ठाकरेंना त्यात पोरकटपणा दिसतोय. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेणारे खरे बाळासाहेबांचे वारसदार हे राज ठाकरेच आहेत.

मी उद्धव ठाकरेंचा नेहमी आदर केला आहे. पण, त्यांनी, माझा फक्त ‘‘Use And throw’’ प्रमाणे वापर केला. त्यामुळे आता आरोप कराल तर मी बोलायला सुरुवात करेन, तेव्हा त्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. त्यांच्या फालतू आरोपांना मी तिथेच उत्तर देऊ शकलो असतो, पण ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी थांबलो असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Deepak Kesarkar Aditya Thackeray And Uddhav Thackeray
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंच्या लाडक्या 'दीपकला' विधान परिषद, राज्यसभेचे वेध; राजकीय निवृत्तीवरून यु-टर्न

तर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केसरकर म्हणाले, नारायण राणेंच्या दहशतीमुळे ठाकरे कुटुंबीला सिंधुदुर्गात राहायला जागाही मिळत नव्हती. त्यांच्या गाड्यांना कोणी पेट्रोलही देत नव्हते. त्यांना गोव्यात जावे लागत होते. अशा वेळी त्यांच्या मदतीला जिल्ह्यात कोणच पुढे नव्हते. पण मी राणेंशी कोणताही वैयक्तिक वाद नसताना तो ओढावून घेतला. राणेंशी व्यक्तिगत संघर्ष केला. पण त्यांनी काय केलं फक्त माझा ‘‘Use And throw’’ प्रमाणे वापर केल्याचा दावा देखील केसरकर यांनी यावेळी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com