Rajan Teli’s Allegation : राजन तेलींच्या आरोपांनंतर वादळ : नारायण राणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला

Narayan Rane meet Devendra Fadnavis Over Nitesh Rane : राजन तेली यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होऊन धड आठवडाही होत नाही तोच नवा वाद सुरू झाला आहे.
Narayan Rane And Devendra Fadnavis
Narayan Rane And Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राजन तेली यांनी आरोप केला आहे की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे सूत्रधार मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे आहेत.

  2. या आरोपानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय तर्कांना उधाण आले आहे.

  3. या बैठकीचा घोटाळ्याशी संबंध आहे का याबाबत अधिकृत माहिती नसली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Mumbai News : तळकोकणासह राज्याच्या राजकारणात नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेली यांनी राजकीय भूकंप आणला आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार हे राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हेच असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले असून मोठा राजकीय हालचालींना वेग आला आहे. तेली यांनी आरोप करताच माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

आगामी स्थानिकसाठी राज्यात मोर्चे बांधनीला वेग आला असून तळकोकणातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यादरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवून आणत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू तथा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या राजन तेली यांना फोडले. त्यांचा प्रवेश ही झाला. पण हा प्रवेश होताना शिंदे यांनी राणेंना विश्वासात घेतल्याचे बोलले जात आहे. प्रवेशाआधी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याशी देखील शिंदे यांनी चर्चा केली होती, अशी चर्चा आहे.

पण या चर्चेदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या तेली यांनी चौथ्याच दिवशी पहिला वार थेट राणेंवर केला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ज्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या घोटाळ्यावरून नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच नारायण राणे मुंबईत पोहचले. त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राणे आणि फडणवीस यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, कशासाठी ही भेट होती याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Narayan Rane And Devendra Fadnavis
Narayan Rane : नारायण राणेंचं हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झालं अन्... काय होता यंत्रणांना घाम फोडणारा प्रसंग?

पण आज फडणवीस यांच्या आगामी स्थानिकसह विविध प्रश्न आणि मुद्द्यांवर सह्याद्री अतिथीगृहावर बैठका होत्या. याच बैठकीनंतर राणे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत आगामी स्थानिकसह सध्या सुरू असलेल्या आरोपांवर चर्चा झाल्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे.

तेली यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तेली यांनी कर्जवाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली. राणे हे बँकेचे संचालक असून त्यांनी अध्यक्ष व सीईओंवर दबाव टाकून मोठ्या रकमांचे कर्जवाटप केल्याचा दावा देखील तेली यांनी केला आहे.

तर कर्जवापट हे कामगार, कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना झाले असून तब्बल आठ कोटींपर्यंतचे कर्ज देण्यात आल्याचेही ते म्हणालेत. तर केवळ राजकीय सुडापोटी या प्रकरणात आपल्यावा अडकविण्यात आल्याचा दावा देखील तेलींनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राज्याची राजधानी मुंबईत देखील हादरे बसले आहेत.

Narayan Rane And Devendra Fadnavis
Narayan Rane : भाजप नेते नारायण राणे तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल; आज शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

FAQs :

प्रश्न 1: राजन तेली यांनी कोणता आरोप केला आहे?
👉 त्यांनी म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार नितेश राणे आहेत.

प्रश्न 2: नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली?
👉 अधिकृत कारण सांगितले गेलेले नसले तरी, ही भेट राजकीय परिस्थिती आणि आरोपांशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

प्रश्न 3: सिंधुदुर्ग बँक घोटाळा काय आहे?
👉 या प्रकरणात बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे अनियमित कर्ज वितरण व गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

प्रश्न 4: नितेश राणेंनी या आरोपांना काय उत्तर दिलं आहे?
👉 अद्याप त्यांच्या कडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु समर्थकांनी हे आरोप राजकीय प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

प्रश्न 5: पुढील पाऊल काय असू शकतं?
👉 या प्रकरणावर तपासाची मागणी होण्याची शक्यता आहे आणि राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com