Raigad Police : रायगड पोलिस दलात खळबळ, पोलिसाला १४ वर्षांची शिक्षा; महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे अमिश देणं पडलं महागात

alibag police blackmail case : रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसातील एका पोलिसाला लग्नाचे अमिश दाखवून महिलेवर बलात्कार करणे महागात पडले असून तब्बल १० वर्षानंतर न्यायालयाने यात निर्णय दिला आहे.
maharashtra police
maharashtra policeSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नागेश पोपट गावडे यांना १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

  2. २०१३ ते २०१५ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार व धमकी दिल्याचा गुन्हा सिद्ध झाला.

  3. न्यायालयाने कारावासासोबतच दिड लाखांहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावला.

Raigad News : रायगड जिल्ह्यातील पोलिस दलात न्यायालयाच्या एका निर्णयाने खळबळ उडाली असून एका पोलिसाच्या कृत्यामुळे पोलिस दलावर दाग लागला आहे. नागेश पोपट गावडे या पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस दलातील एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

आता तब्बल १० वर्षांनी या प्रकरणात नागेश गावडे याला अलिबाग सत्र न्यायालयाने ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून दिड लाखाहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तर नागेश गावडे याने पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला होता.

याबाबत माहिती अशी की, २०१३ ते २०१५ या कालावधीत नागेश गावडे आणि फिर्यादी हे दोघेही पोलीस दलात कार्यरत होते. या कालावधीत दोघांची ओळख झाली. याच कालावधीत आरोपी गावडे याने फिर्यादी महिलेशी जवळीक साधली. तिला लग्नाचे अमिश दाखवून आधी शारिरीक संबध प्रस्तापित केले.

maharashtra police
Maharashtra Crime: लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यास फडणवीस सरकार ठरलं अपयशी

धक्कादायक म्हणजे त्याने त्याचे लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तसेच पिडीत महिलेच्या लक्षात न येता चित्रफीत तयार करत तिला धमकावण्याचे सत्र सुरू केले. तसेच जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नागेश गावडे याच्यार दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर तिवारी यांच्या न्यायालयात सुरू होती.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सराकरी अभियोक्ता कोमल राठोड यांचा युक्तीवाद मान्य केला. तसेच आरोपी नागेश गावडे याला दोषी ठरवत १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला इतर कलमां अंतर्गतही शिक्षा सुनावली. या निकालानंतर आता रायगड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

maharashtra police
Maharashtra crime rate : 10 हजार 467 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हेगारीत राज्य आठव्या क्रमांकावर; मुख्यमंत्री फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ नीती

FAQs :

1. आरोपीला किती वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली?
१४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

2. हा गुन्हा कोणत्या कालावधीत घडला?
२०१३ ते २०१५ या कालावधीत घटना घडली.

3. कोणत्या न्यायालयाने निकाल दिला?
अलिबाग सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.

4. आरोपी कोणत्या विभागात कार्यरत होता?
आरोपी पोलीस दलात कार्यरत होता.

5. दंड किती ठोठावण्यात आला?
दिड लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com