Raigad Politics : जयंत पाटलांचं घर फुटलं, धसका राष्ट्रवादीला : भाजप जिल्हा परिषद स्वबळावर काबीज करणार?

Raigad Politics : शेतकरी कामगार पक्षाला रायगड या त्यांच्या बालेकिल्ल्यातच घरघर लागली आहे. माजी आमदार सुभाष (पंडित) पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
Jayant Patil | Sunil Tatkare
Jayant Patil | Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Raigad Politics : शेतकरी कामगार पक्षाला रायगड या त्यांच्या बालेकिल्ल्यातच घरघर लागली आहे. माजी आमदार सुभाष (पंडित) पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती अॅड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेकापमधील ही सर्वात मोठी फूट आहे. या पक्षप्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

मीनाक्षी पाटलांच्या निधनानंतर फूट :

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील या जयंत पाटील आणि सुभाष पाटील यांच्या बहीण होत्या. त्यांचे गतवर्षी निधन झाले. पक्षाच्या बांधणीमध्ये त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. एकाच कुटुंबात अनेक राजकीय पदे असल्याने कुटुंबात नेहमीच वाद व्हायचा. पण या वादात मिनाक्षी पाटील नेहमी सामंजस्याची भूमिका घ्यायच्या.

पण मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर या कुटुंबातील वाद विकोपाला गेला. विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली. सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली.

Jayant Patil | Sunil Tatkare
Sanjay Shirsat : 'होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात!', शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट कबूलीच दिली

त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. त्याचा परिणाम निवडणुका निकालावर झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली. शिवसेनेचे महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. आता याच नाराजीचा स्फोट झाला असून हा वाद पक्षाच्या फुटीपर्यंत येऊन पोहोचला आहे.

भाजप स्वबळावर सत्ता काबीज करणार?

आता या घडामोडींचा रायगड जिल्ह्याच्या सत्ता समीकरणांवरही मोठा परिणाम होणार आहे. पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. हा गटही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

Jayant Patil | Sunil Tatkare
Raigad : गोगावलेंचं 'पालकमंत्रिपदाचं' स्वप्न धुळीस! फडणवीसांची राष्ट्रवादीसाठी बॅटिंग, शहांकडे टाकला शब्द!

2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 3 जागा मिळवता आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीबरोबर युती शेकापने सत्ता मिळवली होती. आता आताची स्थिती भाजपला पोषक असून, हीच संख्या 30 पेक्षा जास्त जाऊन भाजप एकहाती सत्ता मिळवेल, असा विश्वास भाजपचे दक्षिण रायगड प्रमुख अॅड. महेश मोहिते यांचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com