अनंत गीतेंनी घेतली बंडखोर शिवसेना नगरसेवकांची भेट : लवकरच भूमिका स्पष्ट करणार!

माझी प्रचाराची सभा झाली असती, तर मंडणगड नगरपंचायतीच्या निकालाचे चित्र बदलले असते
Anant Gite
Anant GiteSarkarnama
Published on
Updated on

मंडणगड : नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोणीही अभिनंदन करायला आले नाही; मात्र मी आलो असे म्हणत माजी खासदार अनंत गीते (Anant Gite) यांनी मंडणगड नगरपंचायतीमध्ये निवडून आलेल्या शहरविकास आघाडीप्रणित अपक्ष उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जर माझी प्रचाराची सभा झाली असती, तर मंडणगड नगरपंचायतीच्या निकालाचे चित्र बदलले असते, असे गीते यांनी भेटीप्रसंगी सांगितले. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आघाडी, शिवसेनेतील (shivsena) नेतृत्वबदल गीते यांना पटलेला नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसते. (Anant Gite meets rebel Shiv Sena corporators : will clarify role soon!)

शिवसेना नेते अनंत गिते हे मंडणगड तालुक्यात खासगी दौऱ्यावर आले असताना त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक मुस्ताक दाभिळकर यांच्या निवासस्थानी नगरपंचायतमध्ये निवडून आलेल्या शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांची भेट घेतली. या वेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून आपल्याला डावलून आपल्यावर अन्याय केल्याचे सांगत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

Anant Gite
नगराध्यक्षपदाची चावी राष्ट्रवादीच्या हाती; शिवसेनेच्या सत्तेला थोरवे-लाड संघर्षाचे ग्रहण!

यावर गीते यांनी सूचक बोलताना आज फक्त आपले सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. लवकरच भूमिका घेणार असल्याचे सांगितले. तसेच मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी मी दिलेल्या तारखेला जर सभा घेतली असती तर या निवडणुकीच्या निकालाचे चित्र वेगळे दिसून आले असते, असे सांगत गीते यांनी नगरपंचायत प्रचाराच्या वेळी सभेसाठी वेळ दिला होता. या चर्चेवर शिक्कामोर्तब केले.

Anant Gite
लेकीचा अन्‌ जावयाचा अजितदादांनी हट्ट पुरवताच चोपदाराच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू!

राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू

अनंत गीते यांनी आज शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत नगरपंचायतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवलेल्या आणि अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तालुक्याचे राजकारण वेगळ्या दिशेने जाणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीप्रसंगी माजी तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, अनंत लाखण, स्नेहल सकपाळ, विनोद जाधव, चेतन सातोपे, दीपक मालुसरे, इरफान बुरोंडकर, विश्वनाथ सावंत, संजय शेडगे, राजेश भवणे, अमिता शिंदे, समीक्षा लोखंडे, अहमद मुकादम, किशोर दळवी, नीलेश गोवळे, संतोष पार्टे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com