Mahayuti Political Clash : शिवसेना-राष्ट्रवादीत वाक युद्ध पेटलं! दळवींच्या खोचक सल्ल्यावर तटकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; 'त्यांनीही साहेबांचं मार्गदर्शन'

Aniket Tatkare-Mahendra Dalvi Political Clash : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाक युद्ध थांबायचं नाव घेताना दिसत नसून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने केलेल्या टीकेनंतर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील वादावर पडदा पडल्याचं चित्र असलं, तरी आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यातच महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व जनतेला मान्य नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच, प्रत्येक वेळी राजकीय युक्त्या करून स्वतःचं इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न थांबवावा आणि आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असा सल्लाही त्यांनी तटकरेंना दिला होता.

दळवी यांच्या या टीकेला उत्तर देताना अनिकेत तटकरे यांनी सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख केला. महेंद्र दळवी यांनीही अनेकदा तटकरे साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आहे आणि यापुढेही त्यांचं मार्गदर्शन राहील, असा टोला अनिकेत तटकरे यांनी लगावला. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Politics : रायगडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी! NCP नेत्याला संपवण्याची धमकी? बैलमारेंच्या आरोपांवर थोरवेंचं स्पष्ट उत्तर

नेमकं काय म्हणाले होते महेंद्र दळवी?

सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना महेंद्र दळवी यांनी त्यांना वारंवार राजकीय डावपेच आखून स्वतःला हवं ते साध्य करण्याचा प्रयत्न थांबवण्याचा सल्ला दिला होता. तटकरेंचं वयही बऱ्यापैकी झालं असून, त्यांनी आता शांत राहून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी, असं दळवी म्हणाले होते.

वारंवार राजकीय डावपेच आखून स्वतःचं इप्सित साध्य करणं जनतेच्या दृष्टीने योग्य नसल्याचं सांगत, तटकरेंनी आता थांबावं आणि मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारावी, असंही त्यांनी म्हटलं होतं. दळवी यांच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं.

तटकरेंना दळवींचा दुसऱ्यांदा सल्ला

सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र दळवी यांनी टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी रोह्यातील मुस्लिमबहुल भागातील एका शाळेच्या दुरुस्तीच्या कामावरूनही दळवींनी तटकरेंना लक्ष्य केलं होतं.

या शाळेच्या दुरुस्तीसाठी आपण निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी कामाचं उद्घाटन केलं आणि आपल्याला निमंत्रणही दिलं नाही, असा आरोप दळवींनी केला होता. आपण निधी आणलेल्या कामाचं श्रेय तटकरे घेत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळीही दळवींनी तटकरेंना ‘सबुरीने घ्या’, असा सल्ला दिला होता. तसेच, निर्णय घेण्याच्या घाईवरूनही त्यांनी तटकरेंवर टीका केली होती.

Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Politics : रायगडमध्ये तटकरे-दळवी संघर्ष पेटला; विकासकामांच्या श्रेयावरून जुंपली, अनिकेत तटकरेंचा ‘जशास तसे’चा इशारा!

अनिकेत तटकरेंच्या प्रत्युत्तरामुळे राजकीय संघर्षाला नवी धार

आता महेंद्र दळवी यांच्या ताज्या टीकेला अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिल्याने रायगडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत अनिकेत तटकरे यांनी दळवींनाही त्यांच्या मार्गदर्शनाची आठवण करून दिली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com