
अनिल परब यांनी सावली बार प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा होती, मात्र ही परिषद अचानक रद्द करण्यात आली.
त्याच दिवशी रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी परब यांची अनपेक्षित भेट घेतली.
सदानंद कदम ही भेट काही पुरावे देण्यासाठी घेतली का, यावरून जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
Ratnagiri News : तळ कोकणातील राजकीय वातावरण सध्या अनिल परब यांच्या आरोपांमुळे चांगलेच तापलं आहे. त्यांनी माजी मंत्री तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र विद्यमान मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. योगेश कदम यांना तर पावसाळी अधिवेशनात घेरल त्यांच्यावर वाळू भ्रष्टाचार आणि सावली बारच्या मुद्द्यावरून राजीनामा मागितला होता. तसेच फक्त आरोपच केले नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरावेही सादर केले. अशा घडामोडीमुळे राजकीय वातावरण तंग झाले असतानाच आता पुन्हा एका भेटीने रामदास कदम यांना हादरा बसण्याची शक्यता आहे. (Anil Parab’s Press Conference on Savali Bar Cancelled; Surprise Visit by Ramdas Kadam’s Brother Sparks Speculation)
अधिवेशनात अनिल परब यांनी वाळू भ्रष्टाचारावरून गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाना साधला होता. तसेच त्यांत्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपाची राळ बसते ना तोच मुंबईमध्ये सावली बारवर झालेल्या कारवाईने परबांना आयतं कोलीत मिळालं. अनिल परब यांनी अधिवेशनात पुन्हा एकदा योगेश कदम यांच्यावर आरोप करताना सावली बार त्यांच्या आईच्याच नावावर असल्याचे गंभीर आरोप केले. यानंतर अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. दरम्यान अनिल परब यांनी आपण केलेल्या आरोपांचे पुरावेच राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून दिले. तसेच कारवाईची मागणी केली.
यादरम्यान शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत जाऊन योगेश कदम यांची पाठराखन केली होती. याची जोरदार चर्चा झाली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील यावर जोरदार टीका केली. त्याच व्यासपीठावर रामदास कदम यांनी बंधू सदानंद कदम यांने नाव घेत ते स्वगृही परतल्याचा दावा केला होता. तसेच नाव न घेता अनिल परब यांना इशाराही दिला होता.
अनिल परब पत्रकार परिषद घेऊन सावली बार विरोधात आणखी काही गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही पत्रकार परिषद अचानक रद्द झाली. तर परब यांच्या भेटीला रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम अचानक भेटीला पोहचले होते. यामुळे ते रामदास कदम यांच्याविरोधात काही पुरावे देण्यासाठी तर आले नाहीत ना? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. तर ते का भेटले या मागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
1. अनिल परब यांची पत्रकार परिषद का रद्द झाली?
अधिकृत कारण जाहीर करण्यात आले नाही, पण सदानंद कदम यांच्या भेटीनंतर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
2. सदानंद कदम कोण आहेत आणि ते अनिल परब यांना का भेटले?
ते रामदास कदम यांचे बंधू असून, त्यांनी अनपेक्षितपणे परब यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
3. सावली बार प्रकरण काय आहे?
हे एक राजकीय वादग्रस्त प्रकरण असून, अनिल परब यांनी यासंदर्भात काही गंभीर खुलासे करण्याचे संकेत दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.