Anil Parab : वाळू चोरीनंतर थेट डान्सबार? गृहराज्यमंत्र्यांवर अनिल परबांचा गंभीर आरोप; एकाच अधिवेशनात दुसऱ्यांदा धाम फोडला

Anil Parab Vs Yogesh Kadam : शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रस्त्यासह विधीमंडळात देखील पाहायला मिळत आहे. आता तर दोन्ही शिवसेनेतील नेते एकमेंकावर तुटून पडताना विधीमंडळातही दिसले आहेत.
Anil Parab Vs Yogesh Kadam
Anil Parab Vs Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार असल्याचा गंभीर आरोप केला.

  2. वाढत्या आरोपांमुळे गृह राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी परब यांनी जोरदारपणे मांडली.

  3. हे प्रकरण उघड झाल्यापासून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटला आहे आणि चर्चा गती घेत आहे.

Mumbai News : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी (ता. 18) विधानपरिषदेत केला. त्यांनी कदम यांच्यावर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप केला होता. यानंतर आता योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीतील सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. तसेच परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून याची राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे. (Anil Parab demands resignation of state minister Yogesh Kadam over dance bar)

राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांच्यातील वाद काही नवा नाही. अनिल परब यांनी दापोली नगरपंचातीत योगेश कदम यांना पाय ठेऊ दिले नव्हते. त्याचा वचपा काढतच तीन वर्षानंतर योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंसह अनिल परब यांना धक्का देत दापोलीतील सत्ता ताब्यात घेतली होती. तसेच पक्षाच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदीही बिनविरोध केला होता. याचा परब यांच्या मनात राग असतानाच आयती संधी त्यांना शुक्रवारी (ता. 18) चालून आली.

Anil Parab Vs Yogesh Kadam
Shambhuraj Desai VS Anil Parab : 'तू मंत्री असताना बूट***, गद्दार कोणाला म्हणतो तू बाहेर ये...', शंभूराज देसाई अनिल परब सभागृहात भिडले, एकमेकांची पारच काढली!

कांदिवली येथील सावली बारवर पोलिसांनी धाड टाकली. यात बावीस बारबाला, बावीस ग्राहक मिळून आले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत बारबाला, ग्राहकांसह कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर एफआयआरची प्रत तपासल्यानंतर परमिट ज्योतीरामदास कदम यांच्या नावाने असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता परब यांनी गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यावरून परब यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना, योगेश कदम यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तसेच "जिथे अश्लीलता, भ्रष्टाचाराची गंगा आहे. त्याचं उगमस्थानच जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरातनं असेल, तर राज्याचं काय? मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचं काय असे म्हणत महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच मुख्यमंत्र्यांनी हवा असा हल्लाबोल केला. या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

दरम्यान याआधी देखील याच अधिवेशनात विधानसभेत अनिल परब यांनी वाळूचा मुद्दा उपस्थित करत नियमांवर बोट ठेवले होते. त्यांनी कदम यांचे नाव न घेता, भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कोंडी केली. परब यांनी महसूल राज्यमंत्र्यांचे निलंबन करण्याची हिंमत, ताकद मंत्री बावनकुळे यांनी दाखवावी, अशी मागणी केल्याने सभागृहात गोंधळ उडाला होता. तर राज्यात खळबळ उडाली होती. ज्यानंतर बावनकुळे यांनी परब यांचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी, आपण सभागृहात निवेदन करू असे आश्वासन देत वेळ मारून नेली होती.

परब यांनी विधान परिषदेत वाळूचा मुद्दा उपस्थित करताना, "आमदार वाळू पकडत आहेत. आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्यामध्ये बसतो. पण महसूल राज्यमंत्रीच (Revenue) वाळू पकडतात. याचे आपण पुढच्या तीन दिवसात पाच प्रकरण द्यायला तयार आहे. ज्यात महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली पण ती राज्य सरकारच्या धोरणानुसार गरिबांना द्यायला पाहिजे होती. पण ती दिली नाही.

त्यामुळे महसूलमंत्री बावनकुळे आता तुम्ही जी ताकद, जी हिंमत, एक कणखर महसूलमंत्री म्हणून तलाठी, तहसीलदार, आरटीओंच्या विरोधात दाखवता. तशीच हिंमत, ताकद महसूल राज्यमंत्र्यांचे निलंबन करण्यासाठी दाखवणार का? असा सवाल केला होता. यामुळे अनिल परब यांच्या रडारवर योगेश कदम आले असून त्यांनी एकाच अधिवेशनात दोनवेळा त्यांना निशान्यावर घेत घ्यायाळ केल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Anil Parab Vs Yogesh Kadam
‘अरे गद्दार कुणाला म्हणतो,बाहेर येत तुला दाखवतो’ Shambhuraj Desai यांचं Anil Parab यांना खुलं चॅलेंज

प्र: योगेश कदम यांच्यावर काय आरोप करण्यात आला आहे?
उ: योगेश कदम यांच्या आईच्या नावावर कांदिवलीत डान्सबार असल्याचा आरोप अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला आहे.

प्र: या प्रकरणावर कोणती मागणी करण्यात आली आहे?
उ: अनिल परब यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागितला आहे.

प्र: हे प्रकरण कुठे चर्चेत आलं?
उ: हे प्रकरण महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत चर्चेत आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com