Ashok Kharat Controversy : खरात-नेते फोटो प्रकरण तापलं! ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट इशारा; ‘कॅप्टनला संरक्षण द्या, नाहीतर...’

Vinayak Raut on Ashok Kharat Controversy: नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातचे नव नवे कारनामे समोर येत असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही अडचणीत आल्या. पाद्यपूजा केल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
Ashok Kharat viral photos with political leaders
Ashok Kharat viral photos with political leadersSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अशोक खरात प्रकरणात अश्लील व्हिडिओ आणि राजकीय संबंधांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  2. विनायक राऊत यांनी खरातच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत संरक्षणाची मागणी केली आहे.

  3. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

Ashok Kharat Controversy: नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांसह त्याचे अश्लील व्हिडिओंचा भांडाफोड झाल्याने आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणानंतर पाद्यपूजा केल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही अडचणीत आल्या आहेत.

त्यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असून आता राष्ट्रवादीच्या पदाचाही राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान या भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांसह मंत्र्यांचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.

यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी, खरातची पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमधून वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता असून त्याला संबंधित नेत्यांकडून खरातला संपविला जाण्याची भीती असल्याचा दावा केला आहे.

या दाव्यामुळे आता राज्यात खळबळ उडाली असून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात यांच्या जिवाचे रक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ते चिपळूण दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

अशोक खरात प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. पण त्याही पेक्षा अधीक खळबळ ही राज्यातील अनेक नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोटो खरात बरोबर असल्याचे समोर आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पक्षातील नेते दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. याच फोटोवरून विरोधकांनी जोरदार टीका केली.

तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केसरकर यांच्यांवर जोरदार निशाना साधला. राऊत यांनी तर एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक दावा करत शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Ashok Kharat viral photos with political leaders
Ashok Kharat Controversy : "अशोक खरातची भाची चाकणकरांच्या घरात, त्यांना सर्व गुन्ह्यांची माहिती, फरार होण्याआधीच अटक करा..."

दरम्यान आता पुन्हा एकदा राऊत यांनी, खरात प्रकरणी पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमधून वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड झाल्यास संबंधित नेत्यांकडून खरातला संपविला जाण्याची भीती असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात यांच्या जिवाचे रक्षण करावे असेही म्हटले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन संघटनात्मक बांधणी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी लढण्याची सूचना त्यांनी केल्या. तसेच कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय उपस्थिती न ठेवता जनतेच्या अडीअडचणींमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले देखील त्यांनी केले.

याच वेळी खरात विषयी पत्रकारांनी प्रश्न विचारताच राऊत यांनी सांगितले की, खरात याच्या जाळ्यात सापडून रूपाली चाकणकर यांनी सेवा केली असावी. तर आता चाकणकर यांच्या पदाचा राजीनामा घेऊन दिशाभूल करण्याचा प्रकार होऊ शकतो.

तसेच खरात याचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस जेव्हा खरातकडून वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड करतील तेव्हा या नेत्यांकडूनच खरातला संपविले जाण्याची भीती आहे. हे खरात प्रकरण म्हणजे महाराष्ट्रातील एपस्टिन प्रकरण असून याची अधिक सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. याच चौकशीतून राजकारण्यांची नावे उघड होतील.

पण ज्या दिवशी असे होईल, पोलिसांकडून खरातचे तोंड उघडेल त्यावेळी अर्धे मंत्रिमंडळ घरी जाईल. या मंत्र्यांचे खरे स्वरूप राज्य व देशाच्या जनतेसमोर उघड होईल. पण या कलंकीत भ्रष्टाचारी मंत्र्यांकडून व्हिडीओ प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव येण्याची शक्यता असल्याचाही दावा राऊत यांनी केला आहे.

केसरकर यांची एसआयटी चौकशी होणे गरजेची असून केसरकर यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना खरातचा रस्ता दाखविला. तर खरात याने शिंदेंना गुवाहाटीचा रस्ता दाखविला असा आरोपही राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यावरून आता खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat viral photos with political leaders
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण दडपण्यासाठी डावपेच; सरकारमधील मोठ्या नेत्यांचे थेट संबंध, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

FAQs :

1. अशोक खरात प्रकरण काय आहे?
अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक शोषणाशी संबंधित गंभीर आरोपांचे प्रकरण आहे.

2. या प्रकरणात कोणत्या नेत्यांची नावे येत आहेत?
काही राजकीय नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चा सुरू आहे.

3. विनायक राऊत यांनी काय दावा केला आहे?
खरातच्या जीवाला धोका असून त्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

4. सरकारकडे काय मागणी करण्यात आली आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातचे संरक्षण करावे.

5. पुढे काय होऊ शकते?
तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com