Ashok Kharat Controversy : "अशोक खरातची भाची चाकणकरांच्या घरात, त्यांना सर्व गुन्ह्यांची माहिती, फरार होण्याआधीच अटक करा..."

Sushma Andhare On Rupali Chakankar : 'या प्रकरणात रुपाली चाकणकर सक्रिय सहभागी दिसत असतील तर त्यांना अटक केली पाहिजे. समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे. हा प्रश्न अनेक महिलांच्या इज्जतीचा असून चाकणकरांना पदावरून बाजू केले पाहिजे. रुपाली चाकणकर पॉलिटिकल दबाव आणू शकतात. '
Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Rupali Chakankar seen in a viral video linked to Ashok Kharat controversy, triggering political reactions across Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 Mar : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यापासून राज्यातील राजकारण तापलं आहे. कारण खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.

तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने चांगलीच अडचण झाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सर्व प्रकरणात पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी सोमवती अमावस्येला चाकणकरांनी स्वत:चं बोट कापल्याचं आणि त्या तंत्रमंत्र विद्या करत होत्या, असं आपणाला एका पीडितेने सांगितल्याचा दावा केला आहे.

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

शिवाय यासर्व गुन्ह्यांची माहिती रुपाली चाकणकरांना आहे. त्यामुळे त्या फरार होण्याआधी त्यांना अटक करा, अशी मागणीही अंधारे यांनी केली आहे. याचवेळी सुषमा अंधारे यांनी खरातांचे वडील वारल्यावर तिथे चाकणकर होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणि चाकणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले असून त्याची कागदपत्रे मी दोन दिवसांत सादर करीन, असा मोठा दावा केला आहे.

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Captain Ashok kharat: रूपाली चाकणकरांना पुन्हा दणका, माजी सहकारी म्हणाली, वाट कसली बघता, नैतिकता असेल तर लगेच राजीनामा द्या!

दरम्यान, या सर्व प्रकरणातील कारवाई संदर्भात अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केलं. आणि जर चाकणकर सक्रिय सहभागी दिसत असतील तर त्यांना अटक केली पाहिजे. समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे. हा प्रश्न अनेक महिलांच्या इज्जतीचा असून चाकणकरांना पदावरून बाजू केले पाहिजे. रुपाली चाकणकर पॉलिटिकल दबाव आणू शकतात. चाकणकर आणि खरातचे CDR तपासले पाहिजेत आणि चाकणकर यांना फरार होण्याआधी अटक केली पाहिजे असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com