Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातला कोकणात मोठा झटका, 'तो' जमीन व्यवहार रद्द; चौकशीच्या शक्यतेनं अनेकांचे धाबे दणाणले

Ashok Kharat Wife Kalpana Kharat Land Deal Cancelled : महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेला नाशिकचा कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कमाईने कोकणात ३ कोटींची जमीन अवघ्या ५८ लाखांत घेतल्याचे उघड झाले. यामुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.
Kalpana Kharat
Kalpana Kharat Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अशोक खरातच्या पत्नीने उरणमध्ये संशयास्पद जमीन खरेदी केल्याचे उघड झाले असून व्यवहार रद्द करण्यात आला.

  2. CIDCO प्लॉट रॅकेटशी संबंधित मोठ्या घोटाळ्याची शक्यता तपासात व्यक्त होत आहे.

  3. या प्रकरणामुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

Raigad News : महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेला नाशिकचा कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात याला उरणचे तहसीलदार यांनी जोरदार दणका दिला आहे. खरातच्या काळ्या कमाईतून त्याची पत्नी कल्पना खरातच्या नावे झालेला CIDCO जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आला आहे. एसआयटी मार्फत सुरू असलेल्या चौकशीत सरकारकडून कोट्यवधींचे भूखंड लाटण्याचे मोठे रॅकेट यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यात देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यातच आता हा व्यवहारच रद्द झाल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह शासकीय उच्चपदस्थांचे धाबे दणाणले आहेत.

भोदू बाबा अशोक खरात अटकेत असून त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान रायगड जिल्ह्यात उरणमध्ये त्याने पत्नी कल्पना खरात हिच्या नावे जमीन व्यवहार झाल्याचे समोर आले होते. कल्पना खरात हिने उरणच्या चाणजे परिसरात २० गुंठे जमीन संशयास्पदरितीने खरेदी केल्याचे उघड झाले. तर हा भूखंड CIDCO चा असल्याचेही उघड झाले आहे.

ज्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तर रायगड जिल्हा विकायला काढला आहे का? असा संतप्त सवाल नागरीकांनी केला होता. ज्यानंतर आता उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी हा बेकायदेशीर जमीन खरेदी व्यवहार रद्द केला आहे.

Kalpana Kharat
Ashok Kharat controversy : अशोक खरातची संगत महागात पडणार! बावनकुळे 'अ‍ॅक्शन मोड'वर, महसूलच्या 'त्या' अधिकाऱ्यांची उडाली झोप

खरातने पत्नी कल्पना हिच्या नावाने उरण येथील चाणजे महसुली हद्दीतील सर्वे नं. ३७१/३ मध्ये २० गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा खरेदी व्यवहार १२ मार्च २०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला आणि १७ मार्च २०२६ रोजी तलाठी कार्यालयात याची नोटीस प्रसिद्ध झाली. धक्कादायक बाब म्हणजे, या काळातच खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, तर कल्पना खरात फरार होती. तरी देखील हा व्यवहार थांबला नाही, तो पार पडला आणि १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार मंजुरीची प्रक्रियाही झाली.

या २० गुंठे जमिनीची बाजारभावानुसार किंमत ३ कोटी रुपयांच्यावर असल्याचेही उघड झाले आहे. तर हा व्यवहार कागदो-पत्री केवळ ५८ लाख ५० हजार रुपयांचा दाखवण्यात आला आहे. तर हा भूखंड करंजा मच्छीमार सिडकोचा आहे. सध्या येथे बंदर, रेवस करंजा सागरी सेतू यांसारख्या विकासकामांमुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत.

यामुळे सिडकोच्या साडेबावीस टक्के परतावा योजनेचा लाभ घेऊन कोट्यावधींचा मलिदा कमावण्याचा डाव खरातचा असल्याचे उघड झाले आहे. तर या व्यवहारातील संशयास्पद बाबींसह जिल्ह्यात होणाऱ्या विरोधामुळे हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे. तशी माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.

दरम्यान राजकीय वरदहस्ताचा वापर करून अशा पद्धतीने खरातने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर हेच एसआयटीच्या चौकशीत उघड झाले आहे. तर या व्यवहाराच्या चौकशीमुळे आता अनेक राजकीय नेते आणि शासकीय उच्चपदस्थांचे धाबे दणाणले आहेत.

Kalpana Kharat
Ashok Kharat Case : कुकच्या रुपाने फार्महाउसवर पाठवला गुप्तहेर; सीए ललित पोफळेंचा मास्टरप्लॅन, खरातच्या कुकर्मांचा पेटारा खुला...

FAQs :

1. अशोक खरात प्रकरण नेमके काय आहे?
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या पैशांशी संबंधित बेकायदेशीर जमीन व्यवहाराचा तपास सुरू आहे.

2. कोणता जमीन व्यवहार रद्द करण्यात आला?
उरणच्या चाणजे परिसरातील २० गुंठे जमीन खरेदी व्यवहार तहसीलदारांनी रद्द केला.

3. या प्रकरणात कोणाचे नाव समोर आले आहे?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचे नाव या व्यवहारात समोर आले आहे.

4. CIDCO प्लॉट रॅकेट म्हणजे काय?
शेतकऱ्यांकडून स्वस्तात जमीन घेऊन सरकारमार्फत महागडे प्लॉट मिळवण्याचा संशयित गैरप्रकार.

5. पुढील तपासात काय होण्याची शक्यता आहे?
राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी संबंधित धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com