Chandrapur Mahapalika Mayor: चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी टाकली 'गुगली',काँग्रेसपुढं नवं संकट

Chandrapur Mahapalika News: राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रपुरतील सत्तास्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घटताना दिसत आहे. अशातच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे.
Uddhav Thackeray Chandrapur Mahapalika Pratibha Dhanorkar  .jpg
Uddhav Thackeray Chandrapur Mahapalika Pratibha Dhanorkar .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur News : चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढतच चालला आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तब्बल 20 दिवस उलटल्यानंतर महापौरपदाचा प्रश्न दिल्लीत मिटल्याचं बोललं जात होतं. पण आता चंद्रपूर महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौरपदाबाबत टाकलेल्या आणखी एका नव्या गुगलीमुळे काँग्रेससमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं काँग्रेससमोर चंद्रपूरच्या महापौरपदी जर प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर असेल तर आम्ही काँग्रेसला समर्थन देणार नाही अशी नवी अट टाकली आहे. यामुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस आणि भाजपशी एकीकडे चर्चा सुरू असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे. निकाल लागल्या दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेनं आपलाच महापौर हवा, अशी आघाडी करताना अट घातल्याचं समोर येत आहे.

चंद्रपूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस आणि गरज वाटल्यास भाजपसोबतही जाण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, आता किंगमेकर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.चंद्रपूर महापालिकेत महापौर पदावरून जोरदार चुरस पाहावयास मिळते. एकीकडे काँग्रेस व भाजपने (BJP) महापौर आमचाच होणार असा दावा केला असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार धानोरकर यांचे दोन गट आहेत. त्यांचा हा वाद दिल्ली दरबारी पोहचला होता. त्याठिकाणी वाद मिटवल्यानंतर आता धानोरकर यांचा महापौर तर वडेट्टीवार यांचा उपमहापौर होणार असल्याची चर्चा होती. दुसरीकडे भाजपमध्येही दोन गट आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे आता येत्या काळात महापौर कोणाचा होणार यावरून उत्सुकता लागली आहे. त्यातच आता चंद्रपूर महापौर पदाच्या आखाड्यात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने 'एन्ट्री' केली आहे.

Uddhav Thackeray Chandrapur Mahapalika Pratibha Dhanorkar  .jpg
Ajit Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर भाजपनं तडकाफडकी घेतलेला मोठा निर्णय, आता दादांचा 'तो' शेवटचा व्हिडीओ आला समोर

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या चंद्रपुरतील सत्तास्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घटताना दिसत आहे. अशातच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेस आणि भाजपशी महापौर पदासाठी चर्चा सुरू असलेल्या उबाठा शिवसेनेनेही महापौरपदासाठीचा अर्ज भरला आहे. दिल्लीतील बैठकीनंतर धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटाला अडीच अडीच वर्षे महापौरपद देण्याचं ठरल्याची माहिती समोर आली होती.

सध्या काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक आहेत. स्थानिक विकास आघाडीचे 3 नगरसेवक, एमएमएमचा 1 व बसपा 1 असे मिळून 32 नगरसेवक असल्याचा दावा आहे. मात्र उबाठा व स्थानिक विकास आघाडी ही स्वतः महापौर पदाच्या शर्यतीत आहे. काँग्रेस हाय कमांडने काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला यातून मार्ग काढण्याची जबाबदारी सोपवली असून प्रदेश नेतृत्वाची भिस्त विजय वडेट्टीवार यांच्यावर आहे.

Uddhav Thackeray Chandrapur Mahapalika Pratibha Dhanorkar  .jpg
Sanjay Jadhav On Babajani Durani : अरे 17 वर्ष आमदार राहिला अन् स्वीकृत नगरसेवक झालास... 'चुल्लूभर पाणी मे डुब मरो' : ठाकरेंचा खासदार बाबाजानींवर घसरला!

काँग्रेसच्या 27 नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून यांपैकी धानोरकर गटाकडं 13 तर वडेट्टीवार गटाकडं 14 नगरसेवक आहेत. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 सदस्यसंख्या असून काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपकडे 23 सदस्य आहेत. काँग्रेसला बहुमतासाठी 6 तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित आघाडीला सोबत घेऊन 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आणखीच पेच वाढला आहे. जनविकास सेनेचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघांचीही अडचण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP, Congress
BJP and Congress
Pratibha Dhanorkar at BJP Dahi Handi Event
Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com