
भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर बामदास आणि छमछम अशी तीव्र टीका केली.
कदम यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधवांना “नाचा” म्हणत परंपरागत टोला लगावला.
कोकणातील राजकीय वातावरण या वादामुळे अधिक तापले आहे.
Ratnagiri News : तळ कोकणाच्या राजकीय वर्तुळात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार भास्कर जाधव आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर टीका करत रामदास नव्हे तर बामदास कदम आहे. ते छमछम बामदास असल्याची टीका केली होती. यानंतर आता कदम यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी, भास्कर जाधवांना आम्ही कोकणातील परंपरेत (शिमगा) उच्चारल्या जाणाऱ्या नावाप्रमाणे नाचा म्हणतो, अशी टीका केली आहे. (Bhaskar Jadhav Ramdas Kadam political controversy in Konkan)
रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांनी, भास्कर जाधव यांच्या मतदारसंघावर दावा केला. तर रामदार कदम यांनी, विधानसभेला माझ्या सभा जाधव झाल्या असत्या तर जाधव 20 हजारांनी झोपला असता अशी टीका केली होती. त्यावर भडकलेल्या भास्कर जाधव यांनी जशास तसे उत्तर देताना रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागल्याची टीका केली होती. तर ते रामदास नव्हे तर बामदास कदम असून ठार वेडा आहे. तर सावली डान्सबारचा विषय काढत रामदास कदम छमछम बामदास असल्याचीही टीका कदम यांच्यावर केली होती.
त्यानंतर आता रामदास कदम यांनी भास्कर जाधवांना डिवचताना भास्कर जाधव यांचे राजकारण संपले आहे. त्यामुळे त्याची आणि माझी तुलना करणे किंवा तशी चर्चा होणेच योग्य नाही. कारण भास्कर जाधवची तेवढी अवकात नाही. 1995 ला मी त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे नेलं होतं. त्याला मी तिकीट दिलं होतं. त्यानंतर याच भास्कर जाधवांने भर रस्त्यात आपलं डोकं माझ्या पावलांवर ठेवलं होतं. त्यामुळे भास्कर जाधव आणि माझी तुलना होत नाही.
भास्कर जाधव हा विषय आता संपला असून नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत तो काटावर पास झाला आहे. 1100 मतांनी हा निवडून आला आहे. समोरच्या माणसाला फक्त 1110 मते पडली असती तर हा उलटा झाला असता. पण सुंब जळला तरी पिळ जात नाही अशी अवस्था भास्कर जाधवाची आहे. त्यामुळे आम्ही त्याचं नाव (गोमू) म्हणजेच शिमग्यात नाचणारा नाच्या... नाच्या असं नाव ठेवलयं त्याचं. भास्कर जाधव हा उपकार विसरणारा माणूस आहे. ज्याने उपकार केले त्यांच्यावर तो उलटणारा आहे. अगदी नारायण राणे, उदय सामंत, रामदार कदम, सुनील तटकरेंच्या विरोधात भास्कर जाधव असं सध्याचं चित्र आहे.
कोकणातील एक असा नेता नाही जो सांगेल की भास्कर जाधव चांगला माणूस आहे. भास्कर जाधव हा उपकाराला न जागणारा, खालेल्या अन्नाची जाणीव न ठेवणारा, जेथे खाणार तेथेच छेद करणारा आहे. खालेल्या घराचे वासे मोजणारी अवलाद म्हणजे भास्कर जाधव. सध्याच्या घडीला भास्कर जाधव हा संपलेला विषय असून त्याची साथ अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी सोडलेली आहे. येथील मुस्लिम समाजाने देखील त्याची साथ सोडलेली आहे. भास्कर हा रत्नागिरीच काय तर कोकणातून संपलेला विषय आहे. यामुळे त्यांच्यावर अधिक न बोललेलच कधीही चांगलं. तर आगामी स्थानिकनंतर भास्कर जाधवचा कायमचा निकाल लागलेला असेल हे कोकणासह महाराष्ट्र पाहिलं.
प्र.१: भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वादाचे कारण काय आहे?
उ: शिवसेना नेत्यांमधील परस्पर टीका आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे हा वाद उफाळला आहे.
प्र.२: हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर घडला?
उ: कोकणातील स्थानिक राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत स्पर्धेमुळे हा वाद झाला.
प्र.३: या वादाचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होईल?
उ: हा वाद स्थानिक पातळीवर राजकीय तणाव वाढवू शकतो आणि निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.