Bhaskar Jadhav News: ...अन् उद्धव ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ असलेले भास्करराव जाधव ढसाढसा रडू लागले!

Kokan Politics : गुहागरमधील पांगारी गावातील सडेवाडीत टाकण्यात आलेल्या लग्नाच्या मंडपात सगळीकडे धावपळ सुरू होती. मंगलाष्टकांना काही अवधी शिल्लक होता. तेवढ्यात तिथे कोकणातील मोठं प्रस्थ असलेल्या शिवसेनेचे आमदारांची आपल्या संपूर्ण कुटुंबासह एन्ट्री झाली.
Bhaskarrao jadhav .jpg
Bhaskarrao jadhav .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : एरवी अधिवेशन कुठलंही असो सभागृह दणाणून सोडणारा आक्रमक चेहरा, सभा, पत्रकार परिषदांमधील करारी बाणा, रोखठोक भाषण म्हटलं की, उद्धव ठाकरेंची कोकणातील मुलुखमैदानी तोफ गुहागरचे आमदार भास्कर जाधवांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. आक्रमक शैलीत नेहमी कधी सत्ताधारी पक्ष तर कधी विरोधकांवर तुटुन पडताना कशाचीही पर्वा न करणाऱ्या यादीत कोकणातील एका फायरब्रँड नेते भास्करराव जाधव (Bhaskar Jadhav) यांचं नाव टाळता येणार नाही. पण हेच कणखर जाधव ढसाढसा रडल्याचं समोर आलं आहे.

गुहागरमधील पांगारी गावातील सडेवाडीत टाकण्यात आलेल्या लग्नाच्या मंडपात सगळीकडे धावपळ सुरू होती. मंगलाष्टकांना काही अवधी शिल्लक होता. तेवढ्यात तिथे कोकणातील मोठं प्रस्थ असलेल्या शिवसेनेचे (Shivsena) आमदारांची आपल्या संपूर्ण कुटुंबासह एन्ट्री झाली. एवढंच नव्हे तर हे संपूर्ण कुटुंब घरच्यासारखंच या लग्नसोहळ्यात सहभागीही झाले.

भास्करराव जाधव यांच्या घरी गुहागर मतदारसंघातील पांगारी या गावची सुप्रिया पाटील ही मुलगी जवळपास 8 वर्षांपासून कामाला होती. या काळात तिनं मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा,कष्टाला मागे पुढे न पाहता कामात सतत रममाण राहणं या तिच्या गुणांमुळे जाधव कुटुंबात वेगळंच स्थान निर्माण केलं होतं.

Bhaskarrao jadhav .jpg
Shahaji Bapu Patil : 'मी निवडून आलो असतो तर शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, कारण...'; शहाजीबापूंचा 'सांगोला पॅटर्न'च वेगळा

मिळालेल्या माहितीनुसार,आमदार भास्करराव जाधवांसह त्यांचं संपूर्ण कुटुंबही सुप्रियाला अगदी घरातलं समजू लागले होते. तसेच तिला मुलीप्रमाणेच प्रेम देण्यातही जाधव कुटुंब कुठेच कमी पडत नव्हतं. त्यामुळे तिचं लग्नसोहळा म्हणजे घरचाच समजून जाधव कुटुंबानं तिच्या आनंदात सामील झालं.

पण ज्यावेळी वधू सुप्रियाची पाठवणीची वेळ आली,तेव्हा शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांना प्रचंड गहिवरुन आलं. तसेच सुप्रियानं देखील जाधव यांच्या पत्नी आणि सुनेला मिठी मारतानाच तिचा अश्रूचा बांध फुटला. त्यावेळी बाजूलाच उभे असलेल्या भास्कररावांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

Bhaskarrao jadhav .jpg
BJP Maharashtra : जिल्हाध्यक्षांच्या घोषणेचा भाजप करणार 'ग्रँड इव्हेंट'; 78 जणांना खुर्चीत बसवण्याचा मुहूर्त ठरला!

भास्करराव जाधवांनी सुप्रियाच्या पतीसह सासरच्या मंडळींसमोर ‘सुप्रियाचं कौतुक करतानाच ती आपल्या मुलीसारखी नाही,तर मुलगीच असल्याचं ठणकावून सांगितलं. ती लक्ष्मी असून तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल. याचवेळी त्यांनी सासरच्या मंडळींना सुप्रियाला प्रेमानं वागवण्याची ताकीदही दिली. याचवेळी त्यांनी तिला सुखाचा संसार कर असा आशीर्वाद वजा सल्लाही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com