Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना शिवसेनेचे 'ओपन इन्व्हिटेशन'; कोकणात राजकीय भूकंपाची शक्यता?

Uday Samant on Bhaskar Jadhav Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव सध्या नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचे पक्षातील काही नेत्यांशी वाजले असून त्यांनी थेट निवृतीचा इशारा दिला आहे. त्यांची नाराजी माजी खासदार विनायक राऊत आणि खासदार संजय राऊत यांच्यावर असून ती त्यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जातेय. अशातच त्यांच्या स्टेटसने देखील आता खळबळ उडवून दिली असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना एक सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेची ऑफर दिली आहे. यामुळे कोकणात आता राजकाण ढवळून निघाले आहे.

भास्कर जाधव यांनी नुकताचं एका मुलाखतीवेळी राजकारणातून निवृत्ती घ्याविशी वाटतेय, असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांचे शिवसेनेतील अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर त्यांचा रोख खासदार संजय राऊत यांच्याकडे होता. पण यानंतर जाधव यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, या चर्चा अर्थहीन आहेत, असं म्हटलं होतं.

या चर्चेवरून उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. सामंत यांनी, जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणं बरोबर नाही. हा टोमना नाही. तर आपली खरी भावना असल्याचे सामंत म्हणाले होते. भास्कर जाधव माझ्यावर टीका करत असतात पण ते माझ्यावर नाही तर मातोश्रीचा राग काढत असतात. मला हे माहित आहे. मी त्यांच्या जवळचा असल्यानेच ते ऐकून घेतो. म्हणूनच ते राग काढतात.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Politics : नाराज नाही म्हणणारे भास्कर जाधवांच्या व्हाॅट्सअप स्टेट्सने खळबळ, इशारा की संकेत?

भास्कर जाधव मातोश्रीवर प्रचंड नाराज असून त्यांनी खुल्या मनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारवं. तसे झाल्यास आम्हाला मोठा आनंद होईल, असे म्हणत एक प्रकारे सामंत यांनी शिवसेनेची ऑफरच भास्कर जाधव यांना दिली आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : 'शिस्त पाळणारा नेता, पण मनात घुसमट! भास्कर जाधवांचा पुन्हा संताप! 'पक्षातील बडवे' म्हणत घणाघात

भास्कर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्तल करताना भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात कधी गेली नाही. जी हुजुरी करायला मी कुठे गेलो नाही, असे म्हटलं होतं. तर त्यांचा रोख खासदार संजय राऊत यांच्याकडे होता. त्यावरून राऊत यांनी भास्कर जाधव यांची नाराजी आता उद्धव ठाकरेच दूर करतील. तेच त्यांच्या वक्तव्याची दखल घेतील असे सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com