Bhaskar Jadhav Politics : नाराज नाही म्हणणारे भास्कर जाधवांच्या व्हाॅट्सअप स्टेट्सने खळबळ, इशारा की संकेत?

Bhaskar Jadhav Shivsena UBT Uddhav Thackeray : भास्कर जाधव यांची नाराजी मातोश्रीवरून दूर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईमध्ये भास्कर जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
Bhaskar jadhav Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Jadhav News : मागील काही दिवासांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कार जाधव नाराज असल्याची चर्चा होती. आपण राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे देखील जाधव म्हणाले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी यावर घुमजाव करत आपण पक्षासाठी लढत राहणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे भास्कर जाधवांची नाराजी दूर झाल्याची चर्चा होती. पण त्यांनी व्हाॅट्सअपला ठेवलेल्या स्टेट्‍समुळे एकच खळबळ उडाली आहे.

'दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो... बुझने के बाद घी डालना व्यर्थ है... उसी प्रकार इंसान की कदर समय रहते कर लिजिये... वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है... सब साथ है, फिर भी एक खालीपन सा है.... रिश्तों में आज कल दिखावे का अपनापन सा है...', असे व्हाॅट्सअप स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवले होते.

नाराज नसल्याचे सांगणाऱ्या जाधवांनी दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो. पण तो विझाल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही, असे स्टेट्‍स ठेवून त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे संकेत उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तर, सगळेसोबत असून देखील एकटेपणा असल्याचे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांच्यासोबत सर्व काही ठीक नसल्याचा अप्रत्यक्ष म्हटले असल्याची चर्चा आहे.

Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
BJP Municipal Chief Controversy: धक्कादायक! भाजप नगराध्यक्षाचे पद वाचविण्यासाठी अधिकारी चक्क आयसीयूत दाखल?

निवडणुकांची जबाबदरी

भास्कर जाधव यांनी दोनच दिवसांपूर्वी आपण नाराज नसल्याचे म्हणत पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगपरिषेच्या निवडणुकीच जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. फक्त जबाबादारी घेणार नाही तर पक्षाला विजय मिळवून देऊ, असे देखील त्यांनी म्हटले होते. मात्र, व्हाॅट्स स्टेट्‍समुळे त्यांच्या मनात चलबिचली सुरू असल्याचे मानले जात आहे.

उद्धव ठाकरेंची घेणार भेट

भास्कर जाधव यांची नाराजी मातोश्रीवरून दूर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईमध्ये भास्कर जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ही भेट आजच (गुरुवार) होण्याची शक्यता आहे. या भेटीत ठाकरे हे त्यांची नाराजी दूर करतील, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.

Bhaskar jadhav  Uddhav Thackeray
Vaibhav Sable : अखेर 'तो' लाचखोर उपायुक्त निलंबित! सात लाखांची लाच घेताना सापडला होता रंगेहाथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com