Shantaram More Won Bhiwandi Rural : शांताराम मोरेंनी गुलाल उधळला; ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव

Bhiwandi Rural Assembly Election Shantaram More Shiv Sena Mahayuti : भिंवडी ग्रामीण मतदारसंघातून शांताराम मोरे यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे.
Bhiwandi Rural Assembly Election
Bhiwandi Rural Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Rural Assembly Election Result : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शांताराम मोरे यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महादेव घाटाळ यांचा पराभव केला. त्यामुळे ठाकरेंना धक्का बसला आहे.

शांताराम मोरे यांना 1 लाख 27 हजार 205 मते मिळाली असून त्यांनी घाटाळ यांचा 57 हजार 962 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार मनिषा ठाकरे यांनी 24 हजार 304 मते मिळवली. तर मनसेच्या वनिता कथोरे 13 हजार 816 जागा मिळत चौथ्या क्रमांकावर राहिल्या.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

Bhiwandi Rural Assembly Election
Rajendra Gavit Won : राजेंद्र गावितांचा दणदणीत विजय; पालघरमध्ये ठाकरेंना पराभवाचा धक्का

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार महादेव घाटाळ यांचे आव्हान होते. मात्र, महायुतीचे उमेदवार मोरे यांची मनसे आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारामुळे डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

भाजपच्या महिला नेत्या स्नेहा पाटील यांनी या निवडणुकी बंडखोरी केल्याने महायुतीची मते विभागून मोरे यांना फटका बसले असे चित्र होते. तर मनसेने वनिता कथोरे यांना उमेदवारी देत आव्हान उभे केले होते. या मतदारसंघात मनसेने चांगलाच जोर लावला होता. त्याचाही फटका मोरे यांना बसेल, अशी शक्यता होती. उद्धव ठाकरे यांनी घाटाळ यांच्यासाठी झालेल्या सभेनेही मोरेंचे टेन्शन वाढवले होते. 

Bhiwandi Rural Assembly Election
Sunil Kamble Won : जमेची बाजू असताना देखील, काँग्रेसने कॅन्टोन्मेंट गमावला

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेने एकहाती विजय मिळवला होता. पक्षाचे उमेदवार शांतराम मोरे यांनी तब्बल 83 हजारांहून अधिक मते मिळवली. होती. तर मनसेच्या उमेदवार शुभांगी गोवारी 39 हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार माधुरी म्हात्रे 33 हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 

मागील निवडणुकीतील स्थिती –

शांताराम मोरे (शिवसेना) – 83,567

शुभांगी गोवारी (मनसे) – 39,058

माधुरी म्हात्रे (राष्ट्रवादी) – 33,571

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com