Palghar Vidhan Sabha 2024 Result : पालघर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरले आहेत. शिंदेच्या सेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी दणदणीत विजय मिळवत ठाकरे सेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांचा पराभव केला. उमेदवार निवडीवरून सुरूवातीला अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर राजेंद्र गावितांना उमेदवारी मिळाली होती.
राजेंद्र गावित यांनी 1 लाख 12 हजार 894 मते मिळवली आहेत. त्यांनी दुबळा यांचा ४० हजार 337 मतांनी पराभव केला. मनसेचे उमेदवार नरेश कोरडा यांना केवळ 10 हजार 251 मते मिळाली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीनिवास वनगा यांना एकनाथ शिंदे यांनी यावेळी तिकीट नाकारले. याचा धक्का बसल्याने वनगा यांनी त्यांच्यावर उघडपणे टीका केली. त्यानंतर ते काही दिवस गायब होते.
प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाल्यानंतर मात्र ते शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या व्यासपीठावरही प्रकटले. वनगांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरच दिले होते. त्यामुळे ते सक्रीय झाले होते. पण असे असले त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती. त्याचा फटका गावित यांना बसणार का, याकडे लक्ष लागले होते.
गावित हे आधी भाजपमध्ये होते. निवडणुकीआधी ते शिवसेनेत आले. पण ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती. मागीलवेळी शिवसेना एकसंध होती. यावेळी दोन गट पडल्याने मतदार कुणाला साथ देणार याबाबत उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जयेंद्र दुबळा यांना मैदानात उतरवण्यात आले होते. ठाकरेंनी निष्ठावंत विरुध्द दलबदलू असा जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे वनगांची नाराजी आणि दलबदलू असा प्रचार झाल्याने गावितांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात होते.
श्रीनिवास वनगा (शिवसेना) – 68,040
योगेश नाम (काँग्रेस) – 27,735
उमेश गोवारी (मनसे) -12,819
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.