Konkan Politics : कोकणात कदमांविरोधात भाजप आक्रमक; दापोलीत योगेश कदम उमेदवार नकाे,’ जिल्हाध्यक्षांचा वर्मावर घाव

Ramdas Kadam Vs BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी ‘रामदास कदम यांच्याशी यापुढे कुठलीही चर्चा केली जाणार नाही. हिम्मत असेल तर कदम यांनी युती तोडल्याची घोषणा करावी, तुमची काय ताकद आहे, ते आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान रामदास कदम यांना दिले.
Ramdas Kadam-Kedar sathe
Ramdas Kadam-Kedar satheSarkarnama
Published on
Updated on

Dapoli, 20 August : शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी युती तोडण्यासंदर्भात केलेले विधान आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय आज कोकणात रामदास कदमांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला दापोलीतून योगेश कदम हा उमेदवारच नको, अशी थेट मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केली आहे.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव योगेश कदम आमदार असलेल्या दापोलीत पत्रकार परिषद घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे (Kedar Sate) यांनी ‘रामदास कदम यांच्याशी यापुढे कुठलीही चर्चा केली जाणार नाही. हिम्मत असेल तर रामदास कदम यांनी युती तोडल्याची घोषणा करावी, तुमची काय ताकद आहे, ते आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान रामदास कदम यांना दिले आहे.

रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा कुचकामी मंत्री, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी टीका केली होती. तसेच, भाजपला राक्षसी महत्वकांक्षा असेल तर त्यांनी युती तोडावी. आम्ही आमचे लढतो; तुम्ही तुमचे लढा,’ असेही म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून कोकणात आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे.

कोकणात आज रामदास कदम यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. तसेच, दापोली मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनाच युती तोडण्याची घोषणा करण्याचे आव्हान दिले आहे. आता रामदास कदम हे भाजपचे आव्हान स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे.

Ramdas Kadam-Kedar sathe
Prashant Paricharak : अभिजीत पाटलांचं ठरलं; आता प्रतीक्षा प्रशांत परिचारकांच्या निर्णयाची!

रवींद्र चव्हाण यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होऊन फक्त दोन वर्षे होत आली आहेत. रामदास कदम हे पाच वर्षे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केले, असा सवालही भाजपचे साठे यांनी कदमांना विचारला आहे. रामदास कदम यांना ‘माझं कुटुंब आणि माझा परिवार’ याशिवाय दुसरं काही चांगलं वाटत नाही. चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलं म्हणण्याची मानसिकता त्यांच्यात नाही, असा टोलाही भाजप जिल्हाध्यक्ष साठे यांनी रामदास कदमांना लगावला.

युतीचा उमेदवार पडावा, यासाठी रवींद्र चव्हाण यांनी पैसे वाटल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. पण त्या निवडणुकीत रामदास कदम यांनीच महायुतीच्या विरोधात काम केल्याचे दाखवून देऊ, तसेच त्यांनी केलेले आरोप जोपर्यंत सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, असेही भाजपने त्यांना ठणकावून सांगितले.

Ramdas Kadam-Kedar sathe
Dattatray Bharane : जनसन्मान यात्रेला येताना आपापल्या बायकांना आणा; आमदार भरणेंचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सल्ला

रामदास कदम यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मुलाचा पराभव दिसू लागला आहे, त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला दापोलीतून योगेश कदम हा उमेदवारच नको, अशी थेट मागणीच केदार साठे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com