

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील भाजप-शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.
खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उघड संघर्ष सुरू केला आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडण्याची शक्यता वाढली आहे.
Ratnagiri News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह कोकणात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येथे स्थानिक पातळीवर राजकारण चांगलेच तापले असून महायुतीतील वाद चिघळला आहे. आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींचा बिगूल वाजल्याने एकमेकांवर गंभीर आरोपांची मालिकाच सरुच झाल्याचे दिसत आहे. खासदार नारायण राणे व मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उघड उघड संघर्ष सुरू केल्याचे दिसत आहे. यामुळे महायुतीतीच संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गमध्ये भाजपने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर येथे दोन्ही शिवसेना एकत्रित लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ज्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना एकत्र आल्या तर आम्ही शिवसेनेशी दोन्ही जिल्ह्यात संबंध तोडू असा इशारा देवून या वादात तेल ओतण्याचे काम केलं आहे. या भडक्याची धग आता शेजारच्या रत्नागिरीपर्यंत येवून पोहचली आहे.
काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वबळाची खुमखुमी असेल तर ती आम्ही शिवसेनेचा बाण चालवून ती मिटवून टाकू अशी धमकीच दिली होती.त्यांच्या धमकीविरोधात भाजपचे खासदार राणे व मंत्री नीतेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेची खुमखुमी मिटवायची आमचीही तयारी असल्याचे म्हणत नीतेश राणे यांनी उदय सामंत यांना प्रतिआव्हान दिले आहे. याच आव्हान प्रतिआव्हानमुळे जिल्ह्यात महायुतीकडून एकत्रित निवडणुका लढविण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
जिल्ह्यात सध्या नगरपालिकांसह नगरपरिषदांच्या निवडणुकीची धुळवड सुरू झाली आहे. यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या लागणार आहे. अशातच जागा वाटपावरुन संघर्ष आणि तणाव महायुतीत निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरींमुळे दुरावा वाढला असून यावर विरोधकांकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.
एकीकडे वाद वाढला असतानाही उदय सामंत यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढण्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे ते भाजपला मान्य नसल्याचेच आताच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. 2019 पासून 2024 या पाच वर्षांमध्येच पक्ष जिल्ह्यातील गावागावांमध्ये गेला आहे. यामुळेच रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तसा सक्षम असल्याचे मंत्री निलेश राणे आणि खासदार नारायण राणे म्हणताना दिसत आहेत.
भाजप मंत्री नितेश राणे यांनी तर थेट शिवसेनेला इशाराच देत निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक जागा वाटप व्हावं. आम्हाला कोणी कमी लेखू नये. कोणी हलक्यात घेऊ नये, कोणी आम्हाला सुख्या धमक्या देऊ नये असा इशारा दिला जात आहेत. तसेच मंत्री राणे यांनी तर उदय सामंत यांच्याच भाषेत उत्तर देत कोणाला खुमखुमी काढायची असेल आणि ती मिटवण्यासाठी आम्हीही तयार आहोत, असेही म्हटलं आहे. आता त्यांचा हा इशारा उदय सामंत यांना अप्रत्यक्ष आव्हानच असल्याची येथे चर्चा रंगली आहे.
1. महायुतीत सध्या कोणता वाद सुरू आहे?
रत्नागिरी जिल्ह्यात जागा वाटपावरून नारायण राणे, नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात संघर्ष सुरू आहे.
2. उदय सामंत यांची भूमिका काय आहे?
उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांनी शिवसेनेच्या वतीने महायुतीत आपली भूमिका ठाम ठेवली आहे.
3. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी काय आरोप केले?
दोन्ही राणेंनी महायुतीतील अन्यायकारक जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली असून सामंत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
4. या संघर्षाचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या संघर्षामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता असून विरोधकांना याचा राजकीय फायदा होऊ शकतो.
5. महायुतीत एकोपा राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का?
होय, वरिष्ठ नेते तणाव कमी करण्यासाठी संवाद साधत आहेत, परंतु परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.