Raghav Chadha : धनखड यांचा ‘आप’ला दणका; नेतेपदी राघव चड्ढांच्या नियुक्तीची विनंती फेटाळली

Rajya Sabha : आपचे पक्षनेते संजय सिंह तुरुंगात...
Jagdeep Dhankhar, Raghav Chadha.
Jagdeep Dhankhar, Raghav Chadha.Sarkarnama
Published on
Updated on

AAP News : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आम आदमी पक्षाला दणका दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेच्या नेतेपदी राघव चड्ढा यांच्या नियुक्तीची विनंती केली होती. ही विनंती धनखड यांनी फेटाळून लावली आहे. सध्या तुरुंगात असलेले खासदार संजय सिंह हेच पक्षनेतेपदी कायम राहतील, असे धनखड यांनी स्पष्ट केले आहे.

आपकडून (AAP) पंधरा दिवसांपूर्वी राज्यसभा (Rajya Sabha) सभापतींना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले होते की, ‘संजय सिंग (Sanjay Singh) यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा (Raghav Chadha) हे नेते असतील.’ दिल्ली लिकर पॉलिसी केसमध्ये संजय सिंग हे सध्या तुरुंगात असल्याने पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jagdeep Dhankhar, Raghav Chadha.
Lok Sabha Election 2024 : नवे हिंदुहृदयसम्राट... भाजपचा लोकसभेसाठी मोठा प्लॅन; थरूरांनी थेट घेतलं नाव

आपची ही विनंती धनखड यांनी फेटाळल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. धनखड यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवून विनंती मान्य केली नसल्याचे कळविले आहे. ‘द लीडर्स अँड चीफ व्हीप्स ऑफ रेकग्नाइज्ड पार्टीज अँड ग्रुप्स इन पार्लमेंट (फॅसिलिटी) अक्ट १९९८’ या कायद्याअंतर्गत हा पैलू येतो. नियमांची अधीन नसल्याने विनंती स्वीकारली नसल्याचे धनखड यांनी पत्रात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘आप’कडून भूमिका स्पष्ट

आपकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. धनखड यांनी विनंती फेटाळली नसून दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. त्यावर काम सुरू असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘पीटीआय’ने हे वृत्त दिले आहे.

संजय सिंह तुरुंगात

आपचे राज्यसभेत दहा खासदार आहेत. कथित मद्य घोटाळ्यात अटक केलेले खासदार संजय सिंह हे पक्षाचे नेते आहेत. ते तुरुंगात असल्याने त्यांच्याजागी चड्ढा यांची नियुक्ती करण्याची विनंती आपने केली आहे. पण काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात धनखड यांनी चड्ढा यांचेही निलंबन करण्यात आले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांची निलंबन काही दिवसांनी मागे घेण्यात आले आहे.

Jagdeep Dhankhar, Raghav Chadha.
Bihar Politics : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड; नितीश कुमारांनी पक्षही घेतला ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com