Madhav Bhandari : 'मात्र, हिंदूंच्या मंदिरात आलेला पैसा अन्यत्र जातो?' भाजप नेत्याचे वक्तव्य; काँग्रेस, राष्ट्रवादीवरही टीका

Madhav Bhandari On Waqf Board Act : देशात आज (ता.9) पासून वक्फ बोर्ड कायदा लागू झाला असून आता यावरून प्रतिेक्रिया समोर येत आहे. यावरून भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
sharad pawar sonia gandhi
sharad pawar sonia gandhisarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : देशात आज (ता.9) पासून वक्फ बोर्ड कायदा लागू झाला असून याला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीएचे सरकार होते. यावेळी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी कार्यरत होत्या. पण आज कायदा होत असताना त्या असो किंवा शरद पवार असो यांनी संसदेत चर्चेत भाग घेतला नाही. पण संसदेच्या बाहेर या कायद्याला विरोध करत आहेत. यावरून त्यांनी केलेला 2013 मधील वक्फ बोर्ड कायदा चुकीचा होता असा हल्लाबोल भाजपने केला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करून काँग्रेसह शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. वक्फ बोर्ड कायदा 2013 मध्ये केला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. त्यावेळी युपीएच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार त्यावेळी सत्तेत होते. पण आता जेव्हा वक्फ दुरूस्ती कायदा होत असताना हे दोघेही चर्चेत सहभागी नव्हते असा दावा त्यांनी केला आहे.

सभागृहात मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे होत्या. कायदा बदलत असताना यातील कोणीही सभागृहात विरोधी भाष्य का केले नाही. याचाच अर्थ त्यांनी केलेला 2013 मधील कायदाच चुकीचा होता. त्यामुळेच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेतही सहभाग घेतला नाही, असा दावा भांडारी यांनी केला.

sharad pawar sonia gandhi
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विरोधात सुनावणी कधी? सरन्यायाधीशांनी सिब्बलांना करुन दिली न्यायव्यवस्थेची आठवण

केंद्राने नुकताच वक्फ विधेयक कायद्यात बदल केला. लोकसभेत आणि राज्यसभेत तो मंजूर झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची स्वाक्षरीही झाली आहे. आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. पण कायद्यात रूपांतर होत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मूक गिळून गप्प होते. त्यांनी चर्चेत भागच घेतला नाही. जर त्यांनी केलेला हा कायदा योग्य असता तर त्यांनी किमान त्या चर्चेत भाग घेतला असता. पण प्रियांका गांधी यांनी तर मतदान सुद्धा केले नाही. यावरून हा कायदा चुकीचा बनविला होता हे स्पष्ट होते.

सोनिया गांधी यांनी तर सभागृहातील चर्चेतही भाग देखील घेतला नाही. मात्र, सभागृहाबाहेर येऊन या कायद्याला विरोध केला. अल्पसंख्याकांवर अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला. पण अल्पसंख्यांक म्हणजे नेमके कोण? देशात केवळ मुसलमानच अल्पसंख्यांक नाहीत तर ख्रिश्चन व अन्य समाजही अल्पसंख्यांक असल्याचेही भांडारी यांनी म्हटलं आहे. केवळ मुस्लीम समाजाची भलावण करण्यासाठी हा कायदा केल्याने तत्कालीन सरकारमधील आताचे नेते उघडे पडले आहेत. आता त्यांनी जनतेला उत्तरे द्यावी लागणार असल्याने ते गप्प बसले आहेत.

मंदिराच्या ट्रस्टवर मुसलमान सदस्य चालतात. मात्र, वक्फ बोर्डावर अन्य समाजाची व्यक्ती घेण्यास यांचा विरोध आहे. याच बोर्डवर मुसलमान महिलांना सदस्य म्हणून घेण्यास देखील त्यांचा विरोध आहे. पण ज्या लोकांनी या विधेयकाची बांधणी केली आहे ते आयएएस दर्जाचे अधिकारी असून अभ्यास करूनच ते तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच आता सत्य बाहेर पडणार असल्यानेच काँग्रेस, राष्ट्रवादीवाले याला विरोध करत असल्याचेही भांडारी यांनी म्हटंल आहे.

sharad pawar sonia gandhi
Waqf Board : वक्फ बोर्डाला सर्वाधिक जमीन कोणी दान केली? हैदराबादच्या निजामांपासून ते विप्रोच्या मालकांचा समावेश

हिंदू देवस्थान समित्यांवर नियंत्रण

दरम्यान त्यांनी हिंदूंच्या देवस्थान समित्यांवर नियंत्रण करणारी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी चर्चा सुरू आहे. प्रार्थनास्थळांमध्ये आलेला पैसा केवळ तिथेच वापरता येतो. मात्र, हिंदूंच्या मंदिरात आलेला पैसा अन्यत्र वापरला जातो. त्यामुळे त्यात सुधारणा आणण्याची चर्चा सुरू असल्याचेही भंडारी यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com