एकाच दिवशी राणे पिता-पुत्रांना मिळाला मोठा दिलासा

जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन करीत तोडफोड केल्याप्रकरणी खटला सुरू होता.
Nitesh Rane and Narayan Rane
Nitesh Rane and Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन करीत तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे अडचणीत आले होते. या प्रकरणी सत्र न्यायालयाने राणे यांच्यासह 41 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, नितेश यांचे पिता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही जुहूतील आदिश बंगल्यावरील कारवाईप्रकरणी आजच मोठा दिलासा मिळाला आहे.

डंपर चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्च 2016 रोजी आंदोलन करण्यात आले होते. प्रशासन दखल घेत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन करीत तोडफोड केली होती. त्यावेळी मोठा राडा झाला होता. त्यानंतर राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात होती त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

Nitesh Rane and Narayan Rane
जोडप्याला मारहाण पडली महागात! शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी अडकले

या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यात 20 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचीही समावेश होता. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी रोटे यांनी आज निर्णय सुनावला. न्यायालयाने आमदार नितेश राणे, सतीश सावंत, दत्ता सामंत यांच्यासह 41 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामुळे नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nitesh Rane and Narayan Rane
कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला? तब्बल 15 उमेदवार उतरले रिंगणात

राणेंच्या बंगल्यावरील कारवाईप्रकरणी महापालिकेची माघार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राणेंच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील (Adish Bunglow) बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) कारवाईची नोटीस बजावली होती. मात्र, महापालिकेने उच्च न्यायालयात माघार घेतली आहे. महापालिकेने पाठवलेल्या नोटिशीनंतर राणेंनी वकिलांमार्फत बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नियमानुसार असल्याचा दावा केला होता. हा दावा फेटाळून महापालिकेने पुन्हा नोटीस पाठवत बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, बंगल्यावरील कारवाईचे आदेश मागे घेत असल्याचे महापालिकेने आज उच्च न्यायालयात सांगितले. यामुळे राणेंच्या बंगल्यावरील कारवाई टळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com