जोडप्याला मारहाण पडली महागात! शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी अडकले

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on: 
Updated on: 

जळगाव : एका दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. जळगावात सेंट्रल मॉल परिसरात हा प्रकार घडला होता. आता या प्रकरणात शिवसेनेचे पदाधिकारी अडचणीत आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे समोर आले होते. यामुळे संतप्त झालेले शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी या दांपत्याला मारहाण केली होती. या प्रकरणी दांपत्याने पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली नसतानाही शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून, मंगळसूत्र गहाळ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Shivsena
राणे लढाई जिंकले! अखेर मुंबई महापालिकेने घेतली माघार

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षपार्ह पोस्ट टाकल्याचे समोर आले होते. तो जळगाव येथे खानदेश सेंट्रल येथे चित्रपट पहाण्यास आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्याला शोधून चोप दिला. त्यावेळी त्याची पत्नीही सोबत होती. तिलाही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यावेळी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Shivsena
कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला? तब्बल 15 उमेदवार उतरले रिंगणात

सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोत शरद पवार, उद्धव ठाकरे, इम्तियाज जलील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर होता. या पाठीमागे राहुल गांधीही दाखवण्यात आले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. याआधीही आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अनेकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com