मोठी घडामोड : नितेश राणे सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीशांसमोर होणार सुनावणी

शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत.
Nitesh Rane
Nitesh Rane sarkarnama

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) नितेश राणेंना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यावर राणेंनी आता सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्यासमोर 27 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.

राणे यांनी आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राणेंना राजकीय हेतूने अडकवण्यात आले आहे. त्यांना उच्च न्यायालयाने दिलेले संरक्षण दोनच दिवस बाकी राहिले आहे. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. यावर 27 जानेवारीला सुनावणी घेण्यात येईल, असे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी सांगितले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेले राणे काल (ता.24) प्रथमच कणकवली पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यांची सुमारे पाऊण तास कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती.

Nitesh Rane
मला 'परमसत्य' मांडायचंय! देशमुखांनी चांदीवाल समितीसमोरच टाकला बॉम्ब

उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला आहे. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. (Nitesh Rane Case Updates)

Nitesh Rane
अखेर ठरलं! माजी मुख्यमंत्री राणे विरुद्ध सूनबाई अशीच लढत

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद 13 जानेवारीला पूर्ण झाला होता. नंतर 17 जानेवारीला उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com