BJP-Shivsena UBT War : 'ठाकरेंनी मलई मिळवली, पण आता पायउतार व्हावं लागेल, पक्षही पक्ष संपणार'; भाजपचा दावा

BJP MLA Vikrant Patil On Shivsena UBT : मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या सध्या चर्चा सुरू आहेत. यावरून भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार विक्रांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
BJP MLA Vikrant Patil On Shivsena UBT
BJP MLA Vikrant Patil On Shivsena UBTsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा फुगा फुटला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची कोणती रणनीती आखली तरी त्याचा त्यांना फायदा होणार नाही. त्यांना आगामी निवडणुकीनंतर पाय उताप व्हावं लागेल असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार विक्रांत पाटील यांनी दिला आहे. ते रत्नागिरीत आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पाटील यांनी, मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे यांनी कोणती रणनीती आखली आहे. याची आम्हाला माहिती नाही. त्यांनी आतापर्यंत मुंबई महापालिकेतून मलई मिळवली, असाही आरोप करताना या निवडणुकीत ठाकरेंना पायउतार व्हावं लागले, त्यांचा पक्षही संपेल असा दावाच पाटील यांनी केला आहे.

भाजपचा कार्यकर्ता 365 दिवस जनतेच्या कामासाठी कार्यरत असतो. आमचे मित्रपक्षही अशाच प्रकारे काम करतायत. आम्ही ठाकरें प्रमाणे फक्त निवडणुकीपुरता रणनीती आखत नाही. तर आमची रणनीती वर्षभर सुरू असते. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत महायुती विजयी होईल, असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप स्वबळाचा नारा देणार का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, त्या त्या ठिकाणच्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा निर्णय आमचे महायुतीतील पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

BJP MLA Vikrant Patil On Shivsena UBT
BJP Vs Shivsena UBT : 'तर' पाय सुद्धा ठेवू दिला नसता... अंबादास दानवेंचा 'स्टंट' भाजप आमदाराला चांगलाच झोंबला!

राजकीय स्टंट

तसेच मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी, हा राजकीय स्टंड असल्याचा टोला लगावला आहे. तर कोणत्या परिवाराने एकत्र यावे किंवा बाजूला व्हावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. देवाभाऊ हे 13 कोटी महाराष्ट्रवासियांच्या हृदयातील नेते आहेत. त्यामुळे ते पालक या नात्याने सर्वांच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. ते जनतेचे नेते असल्याचेही पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

प्रभागरचना फायदेशीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रभागात 4 नगरसेवक असल्यास जनतेची कामे करण्यासाठी मदत होईल. त्या नगरसेवकही सक्रिय राहतील. तर जेवढा प्रभाग मोठा तेवढे नगरसेवक असावेत. त्यामुळे ही प्रभागरचना जनतेसाठी फायदेशीर असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

BJP MLA Vikrant Patil On Shivsena UBT
BJP vs Shivsena UBT : फुसका गृहमंत्री, मोदींना मिठी मारली असती सांगणं हा बाळासाहेबांचा अपमान..., ठाकरेंच्या 'सामना'तून अमित शहांवर जहरी टीका

राष्ट्रवादीबाबत ठोस माहिती नाही

शरद पवार राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आमदार पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीबाबत अशी कोणतीही बातमी नाही, त्यामुळे ठोस माहिती मिळाल्याशिवाय चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com