BJP Janata Darbar : भर जनता दरबारात नारायण राणे भडकले? भाजप पदाधिकाऱ्यांचे थेट कानच टोचले

BJP MP Narayan Rane : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबारात घेतला. पण याच जनता दरबारात त्यांनी आपल्याच पक्षाच्या पदाधिकार्‍यांची कान उघडणी केलीय.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चिपळूण गुहागर तालुक्यातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेतला.

  2. दरबारात राणेंनी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी सक्षम नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली.

  3. या कार्यक्रमाला शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपचा राजकीय डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Chiplun News : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, पाणी योजनेसारख्या सामाजिक व सार्वजनिक समस्यांसह धार्मिक, वैयक्तिक स्वरूपाच्या समस्यांचा पाढा खासदार नारायण राणे यांच्यासमोर वाचण्यात आला. त्यावर या सर्व समस्या गांभीर्याने घेत लवकर न्याय दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितीतांना दिली. पण यावेळी राणे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. त्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांचे कान टोचले. तर राणे यांनी पक्षाचा कार्यकर्ता व पदाधिकारी सक्षम नाहीत, असा चिमटा काढल्याने आता जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून उदय सामंत यांनी ज्या प्रमाणे नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आपण सांगू ती दिशा असा राजकीय वट तयार केला आहे. तसाच सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. यामुळेच त्यांनी भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर जे सिंधुदुर्गात होईल. तेच रत्नागिरीत सुत्र अवलंबू असा थेट इशारा दिला होता. यानंतर आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर भाजपने रत्नागिरीत चाचपणी करण्याची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी जनता दरबारात घेत स्थानिकच्या तयारीचाही आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.

शहरातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार सभागृहात खासदार नारायण राणे यांनी चिपळूण गुहागर तालुक्यातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी जनता दरबार घेतला. या वेळी 105 नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक आणि विकासकामांच्या समस्या मांडल्या. यातील काही समस्या आणि कामांवर तत्काळ कार्यवाही केली तर उर्वरित समस्या आणि मागण्यांवर शासकीयस्तरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Narayan Rane
Narayan Rane : शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचा जनता दरबार! राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस ‘धडाकेबाज’ डाव खेळण्याच्या तयारीत

यावेळीच राणे यांनी आपला मोर्चा भाजप कार्यकर्त्यांकडे वळवत कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात. तरच असे प्रश्न सुटू शकतात. प्रत्येकवेळी राणेंकडे प्रश्न घेऊन जाण्याची वेळ येणार नाही. याशिवाय अधिकाऱ्यांनीही उद्या प्रश्न सोडवण्यापेक्षा आज का नाही, याचाही विचार करायला हवा. कायद्यात किंवा नियमात बसत नसेल तर ते तत्काळ नामंजूर करा, वर्षानुवर्षे ते रखडत ठेवू नका. याचपद्धतीने आपली कार्यपद्धती चालते. गाव तेथे 18 नागरी सुविधा असायलाच हव्यात, असेही बजावले.

डॉ. नातू कामच करत नाहीत

गुहागर तालुक्यातील काताळे नवानगर येथील रमेश खारवटकर यांनी आपल्या गावातील पाणीयोजना व समस्या मांडताना वर्षानुवर्षे एकही विकासकाम न झाल्याची खंत व्यक्त केली. माजी आमदार (कै.) डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या काळात कामे होत होती; मात्र आता दुर्लक्ष केले जाते, असेही स्पष्ट केले. यावर राणे यांनी डॉ. विनय नातू कामे करत नाहीत का, असा सवाल केला. त्यावर खारवटकर यांनी नातू एकही काम करत नाहीत. आम्ही त्यांच्या तोंडावर सांगतो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. या वेळी डॉ. नातू हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

Narayan Rane
Narayan Rane : नारायण राणेंचं हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झालं अन्... काय होता यंत्रणांना घाम फोडणारा प्रसंग?

FAQs :

1. जनता दरबार कुठे आयोजित करण्यात आला होता?
चिपळूणमध्ये नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात जनता दरबार आयोजित करण्यात आला.

2. नारायण राणेंनी कोणत्या विषयांवर चर्चा केली?
गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

3. त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांबद्दल काय वक्तव्य केले?
कार्यकर्ते आणि पदाधिकारी सक्षम नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

4. या दरबाराचा राजकीय अर्थ काय लावला जातोय?
भाजपने शिवसेनेला घेरण्यासाठी हा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे.

5. या कार्यक्रमामुळे कोणत्या पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे?
शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com