Narayan Rane : मोठी बातमी! खासदार राणेंची अचानक तब्येत बिघडली; तातडीने मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

MP Narayan Rane admitted to hospital news : भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांची तब्बेत बिघडली असून त्यांनी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • भाजप खासदार नारायण राणे यांना हृदयाशी संबंधित उपचारांसाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • कणकवलीतील सत्कार समारंभात त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत मुलांना भावनिक आशीर्वाद दिले होते.

  • त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या डॉक्टरांचे निरीक्षण सुरू असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

kankavli/Mumbai News : नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. जिल्ह्यातील एकुण 50 जागांपैकी तब्बल 27 जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने तब्बल 14 जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. नगर पालिका आणि नगर पंचायती प्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नसल्याने जिल्ह्यात राणे पॅटर्नच भारी असल्याची चर्चा रंगली आहे. या विजयामुळे एकीकडे भाजपमध्ये जल्लोषी वातावरण असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे भाजपमध्ये सध्या चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्याचा गुलाल उधळला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार लवकरच बरे होतील असे म्हटले आहे.

तोच आता भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांना हृदयाशी संबंधित आजारामुळे मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर येथे उपचार होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Narayan Rane
‘राणेंचं आता वय झालंय, त्यामुळे चुकीचं विधान करताय’ राऊतांचा वार, Sanjay Raut, Narayan Rane, Mumbai

दरम्यान काहीच महिन्यांच्या आधी पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणूकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले होते. या यशानंतर नारायण राणे यांचा कणकवलीत भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी, आपल्या भाषणात राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

त्यांनी, आता आपण थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच दोन्ही मुले कतृत्वान असून ते राजकारणाच्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना आशीर्वाद देताना नांदा सौख्यभरे असा आशीवार्द देखील मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांना दिला होता.

Narayan Rane
Narayan Rane : नारायण राणेंनी डाव टाकला, भाजप जिल्हाध्यक्षाला ठणकावतं केली महायुतीची घोषणा

FAQs :

1. नारायण राणे यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे?
मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

2. नारायण राणेंना कोणत्या आजारावर उपचार सुरू आहेत?
हृदयाशी संबंधित आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

3. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे?
त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

4. नारायण राणेंनी निवृत्तीबाबत काय संकेत दिले होते?
कणकवलीतील सत्कार समारंभात “आता आपण किती करणार” असे म्हणत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते.

5. त्यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय लावला जातो?
राजकारणाची जबाबदारी पुढील पिढीकडे देण्याचा तो संकेत असल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com