Ravindra Chavan: भाजपकडून मंत्रिपदासाठी पत्ताकट, प्रदेश कार्याध्यक्षपदी वर्णी, हे प्रमोशन की डिमोशन? चव्हाणांनी आतली गोष्ट सांगितली

BJP Politics : राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भाजपचे आमदार सुरेश धस आरोप करत आहेत. त्यावर चव्हाण यांनी अधिक भाष्य करणं टाळलं पण ते म्हणाले, ज्या लोकांची चूक आहे, त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की शासन करतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan News : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचत अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाला. त्यात छगन भुजबळ,सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित,तानाजी सावंत, सुरेश खाडे यांच्यासह रवींद्र चव्हाण यांचा समावेश होता. यामुळे या नेत्यांनी उघडउघड नाराजी बोलून दाखवली.

भाजपकडून रवींद्र चव्हाणांवर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. मंत्रि‍पदाचा पत्ताकट करुन चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी हे त्यांचं प्रमोशन की डिमोशन याबाबत उलटसुलट चर्चा भाजपसह राजकीय वर्तुळात सुरू आहेत.यावर आता स्वत: रवींद्र चव्हाणांनीच (Ravindra Chavan) मोठं भाष्य केलं आहे.

महाराष्ट्र भाजप (BJP) प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी साम वृत्तवाहिनीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात त्यांची भाजपचं पक्षसंघटन, सत्ता,शिस्त,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वासह विविध मुद्द्यांवर रोखठोक मतंही व्यक्त केली. त्यात त्यांनीं मंत्रिमंडळातून डच्चू तसेच महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या चर्चांवरही आपली भूमिका मांडली.

रवींद्र चव्हाण म्हणाले,भारतीय जनता पार्टीत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात संघटनात्मक पातळीवर चांगलं पद मिळावं यासाठी धडपड सुरू असते.जेव्हापासून पक्षाचं काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून सातत्यानं नेहमीच असा विचार करायला सुरूवात केली. संघटनात्मक कामात रुची असल्यामुळे आणि ते काम करताना एक वेगळा आनंदही असतो. असंही त्यांनी सांगितलं.

Ravindra Chavan
Shiv Sena new project: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा 'हा' उपक्रम आता शिवसेनाही राबविणार; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मोठी घोषणा

तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी,नेत्यांसोबत असलेले संबंध,आणि केंद्रीय नेतृत्वाचे सातत्याने दिले जाणारे कार्यक्रम, त्यात असणारं नाविन्य,पक्षवाढीसाठी, आणि विचारधारेमध्ये काम करणार्या कार्यकर्त्याला एक वेगळा आनंद मिळत असतो.त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रि‍पदापेक्षा संघटनेत काम करताना जास्त आनंद वाटतो ,असं उत्तर चव्हाणांनी यावेळी दिलं.

यात महत्त्वाचं काय तर ,महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला जे बहुमत दिलं.जे या आधी कधीच महायुतीलाही मिळालं नाही आणि भाजपलाही मिळालं नाही.ज्या संख्येनं आम्हांला जागा मिळाल्या,मागच्या सलग तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत. आतातर 132 जागा आल्या आहेत.त्यामुळे सरकारकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे चालणं,हे फार गरजेचं असतं, असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

Ravindra Chavan
Supriya Sule on Ajitdada : अजितदादांसोबतच्या संबंधावर सुप्रिया सुळेंचे प्रथमच मोठे भाष्य; ‘मी अजित पवारांशी बोलते; पण...’

ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे.त्यावर स्वतः चव्हाण यांनी उत्तर दिले.चव्हाण म्हणाले,'वर्षानुवर्ष मी भाजपच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहोत.पण आमच्यात कधीच तिढा निर्माण झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

याचदरम्यान, त्यांनी पक्षसंघटनेत काम करताना आपलं काय ध्येय आहे हे आम्हा दोघांनाही माहीत आहे. आमचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत असतो. अनेक वर्ष आम्ही युतीत एकत्र काम केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकदा निर्णय झाला की आम्ही त्या दिशेने जाऊ', असंही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

Ravindra Chavan
Kirit Somaiya target Supriya Sule : ''EDची नोटीस आली तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळे यांच्यासोबत...'' ; किरीट सोमय्यांचं विधान!

खरंतर पत्रकारितेकडे चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते.त्यामुळे माध्यमांनी सकारात्मक गोष्टींकडे पाहिले पाहिजे. शंभर गोष्टी सकारात्मक आहेत. त्या गोष्टी माध्यमांनी सकारात्मक बातम्या देखील दाखवल्या पाहिजेत. त्या लोकांसमोर घेऊन जाल तर या गोष्टी का करणं गरजेचे आहे, हे लक्षात येईल असंही त्यांनी म्हटलं.

राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भाजपचे आमदार सुरेश धस आरोप करत आहेत. त्यावर चव्हाण यांनी अधिक भाष्य करणं टाळलं पण ते म्हणाले, ज्या लोकांची चूक आहे, त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की शासन करतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com