Video Amol Kolhe : महाराष्ट्रात 'साहेब' कोण? अजितदादांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हेंनी सांगितली दोन नावं

Amol Kolhe Ajit Pawar balasaheb Thackeray Sharad Pawar : एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
Amol Kolhe Ajit Pawar
Amol Kolhe Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडामधील एका सभेत बोलताना आता उमेदवारी कोणाला द्यायची हे वारंवार कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही. कारण आता आपणच साहेब आहोत, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे.

कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही. आमच्या पिढीला फक्त दोनच साहेब माहीत आहेत,असा टोला अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला.

साहेब दोनच, आदरणीय शरद पवारसाहेब आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आमच्या पिढीला तर हे दोनच साहेब माहीत आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. आमची पिढी या दोघांनाच साहेब मानते, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले.

Amol Kolhe Ajit Pawar
Ramdas Athawale News : राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होणं नाही. त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग, सामाजिक व्यासंग असेल, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल. संकटाच्यावेळी संकटाचं वादळ छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर घेणं असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. हे दादांना माझ्या सारख्या कार्यकर्त्यांने सांगण्याची गरज नाही, असे देखील कोल्हे म्हणाले.

अजितदादांच्या बॅनरवर अमोल कोल्हे

उपमुख्यमंत्री अजित पवार खेड विधानसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.12) विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. अजित पवारांच्या मेळाव्यातील फ्लेक्सवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा फोटो झळकला होता, यामुळं आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Amol Kolhe Ajit Pawar
NCP SP News : "चिंता करु नका, तासगावची सीट फिक्स पण..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या लेकाला केली 'ही' विनंती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com