Shivsena UBT : स्वीकृत नगरसेवक कोण? ठाकरेंच्या शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी अन् जोरदार रस्सीखेंच

Chiplun municipal council : चिपळूण पालिकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली असून आता स्वीकृत नगरसेवकपदाासठी ठाकरेंच्या शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे.
Shivsena UBT; Bhaskar jadhav And Vinayak Raut
Shivsena UBT; Bhaskar jadhav And Vinayak Rautsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चिपळूण पालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी ठाकरे शिवसेनेत मोठी स्पर्धा सुरू आहे.

  2. पराभूत उमेदवार व माजी नगरसेवक इच्छुक असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांत नाराजी आहे.

  3. या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत तणाव निर्माण झाला आहे.

Chiplun News : नुकताच झालेल्या चिपळूण पालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. येथे नगराध्यक्षपदी शिवसेना भाजप युतीचे उमेश सकपाळ विजयी झाली आहेत. आमदार शेखर निकम, भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांना या निवडणुकीत मोठा धक्का देण्याचे काम भाजप-शिवसेना युतीने केले. यानंतर आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला देखील स्वीकृत नगरसेवकपद मिळणार असून ते कोणाला मिळते याकडे पराभूत उमेदवारांसह काही माजी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने जार लावत आपल्या जागा वाढवत सात जागा निवडून आणल्या. भाजपने एका वेळी दोन विद्यमान आणि एका माजी आमदाराला पराभवाचा धक्का देत आपली ताकद वाढवली. मात्र आमदार शेखर निकम भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम यांसारख्या दिग्गजांना आपल्यातील वाद नडल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे भाजप-शिवसेना युतीने स्पष्ट बहुमत मिळवले तर दुसरीकडे आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यातील वादाचा फटका येथे बसल्याचे दिसत आहे. भास्कर जाधव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून माजी आमदार रमेश कदम यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला. त्या बदल्यात काही जागा पदरात पाडून घेतल्या; मात्र माजी खासदार विनायक राऊत यांनी नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर उमेदवार उभे केले. त्याचा फटका माजी आमदार रमेश कदम यांना बसला. तसचा तो ठाकरेंच्या शिवसेनेलाही बसला.

Shivsena UBT; Bhaskar jadhav And Vinayak Raut
Shivsena UBT Politics : काँग्रेसचा सल्ला धुडकावत ठाकरे सेनेचा मास्टरस्ट्रोक! कोल्हापूरच्या कळीच्या मुद्द्यालाच घातला हात

पण यामुळे शिवसेनेत वाढलेल्या नाराजीमुळे अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. याचदरम्यान आता पालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

पालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला स्वीकृत नगरसेवकपद मिळणार असून ते आता कोणत्या गटाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर स्वीकृत सदस्यपदासाठी पराभूत उमेदवारांसह काही माजी नगरसेवकांकडून जोर लावला जात आहे. पालिकेत जाण्यासाठी पक्षाचे काही जुने पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पण याच वेळी वादाची ठिणगी पडली आहे.

पक्षाचा पालिकेतील गटनेता निवडताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, अशी काहींची तक्रार आहे. पालिका निवडणुकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यात आम्हाला विश्वासात घेतले नाही. या बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही, अशी पराभूत उमेदवारांची खंत आहे. जे उमेदवार काठावर पराभूत झाले आहेत त्यांच्यापैकी एकाला स्वीकृत म्हणून संधी मिळावी, अशी मागणी सुरू आहे.

Shivsena UBT; Bhaskar jadhav And Vinayak Raut
Shivsena UBT : होय, मी उद्धव ठाकरेंवर नाराज; वेगळ्या भूमिकेबाबत... : बाळासाहेबांसोबत काम केलेल्या नेत्याने उघडपणे मांडली भूमिका

चिपळूण पालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल तो पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असेल. कोणत्याही गटातटाचा विचार न करता सामान्य शिवसैनिकाला संधी दिली जाईल.

- भैय्या कदम, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट

FAQs :

1. चिपळूण पालिकेत कोणत्या पदासाठी चर्चा सुरू आहे?
स्वीकृत (नॉमिनेटेड) नगरसेवकपदासाठी.

2. कोण कोण इच्छुक आहेत?
पराभूत उमेदवार, माजी नगरसेवक तसेच काही वरिष्ठ कार्यकर्ते.

3. कार्यकर्ते नाराज का आहेत?
पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलले जाईल, अशी भीती त्यांना आहे.

4. हा वाद कोणत्या पक्षात आहे?
ठाकरे गटाच्या शिवसेनेत (शिवसेना UBT).

5. निर्णय कधी अपेक्षित आहे?
लवकरच पक्ष नेतृत्वाकडून स्वीकृत नगरसेवकाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com