Thackeray Shivsena UBT Issues Vachannama for Kolhapur Municipal Corporation Elections
Thackeray Shivsena UBT Issues Vachannama for Kolhapur Municipal Corporation Electionssarkarnama

Shivsena UBT Politics : काँग्रेसचा सल्ला धुडकावत ठाकरे सेनेचा मास्टरस्ट्रोक! कोल्हापूरच्या कळीच्या मुद्द्यालाच घातला हात

MVA internal differences Over Congress and Shivsena UBT manifesto : कोल्हापूर महानगरपालिकेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.
Published on
Summary
  1. ठाकरे शिवसेनेकडून कोल्हापूर महापालिकेसाठी जाहीरनाम्याऐवजी वचननामा सादर करण्यात आला.

  2. हद्दवाढीच्या मुद्द्यावर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद स्पष्ट झाले आहेत.

  3. या मतभेदांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद समोर आला आहे.

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीरनामा नव्हे तर वचननामाच दिला. भ्रष्टाचार मुक्त कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, काल काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये हद्दवाढ संदर्भात पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ठाकरे सेनेकडून वचननाम्यात थेट हद्दवाढ केलीच जाईल असा ठोस उल्लेख केल्याने महाविकास आघाडीतील मत मतांतरे दिसून येत आहेत.

ठाकरेंच्या सेनेने केलेल्या जाहीरनामात शहराचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सांडपाण्याचे नियोजन आणि पावसाळे पाण्याचे नियोजन, स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, निवासिनी श्री अंबाबाईसाठी अन्नछत्र, गृहनिर्माण प्रकल्प, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन, पंचगंगा प्रदूषण महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढी संदर्भात वचननामा ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात आला.

Thackeray Shivsena UBT Issues Vachannama for Kolhapur Municipal Corporation Elections
Congress Vs Shivsena UBT : प्रणिती शिंदेंच्या दारात गेला तर पक्षातून हाकलेन : ठाकरेंच्या नेत्याचा सज्जड दम; सोलापूरात वाद टोकाला

पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली. विचार विकला अशी टीका ठाकरे यांच्यावर झाली. सत्तेसाठी भाजप कुठल्या थराला गेली. हे दोन दिवसापूर्वी समजले.

सत्तेसाठी भाजप एमआयएम सोबत गेली. म्हणजे आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट हीच त्यांची भूमिका आहे. घटक पक्षांसाठी भाजप सांगेल तीच पूर्व दिशा अशीच परिस्थिती असल्याचा टोलाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी लगावला. यावेळी शहराध्यक्ष सुनील मोदी, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवासेना प्रमुख, मनजीत माने, सागर साळोखे, विकी मोहिते यांच्यासह ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार उपस्थित होते.

दरम्यान आज ठाकरेंच्या सेनेने वचननामा जाहीर करत असताना काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील असागावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, हे उपस्थित होते. रात्र ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार हे मात्र उपस्थित नसल्याने त्याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती.

Thackeray Shivsena UBT Issues Vachannama for Kolhapur Municipal Corporation Elections
Shivsena UBT Vs Congress : ठिणगी पडली! “...तर काँग्रेसला हिसका दाखवू”; शिवसैनिकांनी घेतली बाळासाहेब ठाकरेंची शपथ

FAQs :

1. ठाकरे शिवसेनेने जाहीरनाम्याऐवजी वचननामा का दिला?
→ मतदारांना थेट आश्वासन देण्यासाठी वचननामा देण्यात आला आहे.

2. वचननाम्याचा मुख्य मुद्दा काय आहे?
→ भ्रष्टाचारमुक्त कोल्हापूर महानगरपालिका हे मुख्य उद्दिष्ट आहे.

3. हद्दवाढीवर वाद का निर्माण झाला आहे?
→ ठाकरे शिवसेनेने थेट हद्दवाढ केलीच जाईल असा उल्लेख केल्यामुळे.

4. काँग्रेसची भूमिका काय आहे?
→ ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

5. या मतभेदांचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
→ आघाडीतील मतभेदांचा प्रचारावर व मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com