
Raigad News : गेल्या महिन्यातच रायगडमध्ये शेकापला हा मोठा धक्का (Raigad Politics) बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा धक्का येथे बसला असून शेकापचे तगडे नेते तथा पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेकापला रामराम ठोकला आहे. तसेच स्थानिकच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे भाजपची ताकद वाढली असून जयंत पाटील यांना धक्का बसला आहे.
दरम्यान गेल्याच महिन्यात जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिवसेना, राषट्रवादीनंतर शेकापमध्ये फूट पडल्याचे बोलले जात होते. यानंतर आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून जे.एम.म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांची साथ सोडली आहे. यामुळे रायगडसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सध्या राजगडमध्ये राजकीय भूकंप होत असून शिवसेना ठाकरे गटानंतप शेकापमध्ये राजकीय ऑउट गोईंग सुरू झाले आहे. पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप आला असून भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे.
शेकापचे नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह मनसे कार्यकर्ते, हजारो पदाधिकारी, माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांनी भाजपात प्रवेश केला आहे.
विधान परिषद निवडणूक असो की विधानसभा महाविकास आघाडीने मित्र पक्ष असणाऱ्या शेकापला योग्य संधी दिलेली नाही. प्रत्येक वेळी घात केल्याने रायगडमध्ये सध्या शेकापला विचार करण्याची वेळ आली असून यामुळेच मविआला सोडचिठ्ठी द्यावी, अशी मागणी जे.एम. म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. यानंतर कोणताही निर्णय न झाल्याने शेवटी जे. एम. म्हात्रे यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी साथ दिली.
जे.एम. म्हात्रे यांनी पक्ष सोडण्याची निर्णय घेताच शेकापमध्ये मोठे खिंडार पडले असून हजारोंच्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. जे. एम. म्हात्रे हे जवळपास 50 वर्षापासून शेकाप पक्षाचे काम करत आहेत. ते पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. तर उरण मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांनी निवडणुक लढवली होती. पण महाविकास आघाडीने त्यांना मदत केली नाही. तसेच विधान परिषदेवेळी देखील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना ठाकरे गटाने देखील दगाफटका केल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.